subhash faldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Faldesai: परप्रांतीय तरुणाची मंत्र्यांसमोर दादागिरी; पोलिसांनी केली उचलबांगडी

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी शापोरा येथे भेट देत केली पाहणी

दैनिक गोमन्तक

शिवोली: राज्याचे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी सकाळी बार्देशातील शापोरा येथील पुरातन किल्याला भेट देत तेथील परिसराची पाहाणी केली. यावेळी किल्ल्याची झालेली पडझड तसेच पायथ्याशी बेकायदा उभारण्यात आलेले गाळे व तेथील परिसरात जमा झालेला कचरा पाहून संताप व्यक्क केला. यावेळी किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदा उभारण्यात आलेले गाळे चोवीस तासाच्या आत हटविण्याचे आदेश मंत्री फळदेसाई यांनी मामलतदारांना दिले.

(Minister Subhash Faldesai crackdown on illegal stall at Chapora fort)

बेकायदा गाड्यांची पाहाणी करतेवेळी एका परप्रांतीय तरुणाने मंत्री फळदेसाई यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने हणजुण पोलिसांकडून त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्या तरुणाच्या विरोधात कलम 151 खाली गुन्हा नोंदवत त्याला कायदेशीर अटक करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक फ्रांन्सिस झेवीयर यांनी दिली. दरम्यान, बार्देशातील प्रमुख पर्यटन केद्रांपैकी एक असलेल्या शापोरा येथील पुरातन तसेच इतिहासकालीन किल्ल्याचे जतन तसेच तेथील शुभोभीकरणाचे काम या आधीच सुरु करण्यात आलेले आहे.

Chapora

लवकरच याभागात पर्यटकांच्या सोयीसाठी सुसज्ज असे प्रसाधन गृह उभारण्यात येणार असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील मंदिरांची नासधूस तसेच मोडतोड झालेल्या मंदिरांच्या पुनर्वसनासाठी सरकार सर्वतोपरीने आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले.

देवस्थान समित्यांकडून पुरावे सादर करावे लागणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना स्पष्ट केले. यावेळी, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, हणजुण -कायसुव पंचायतीचे सरपंच चिमुलकर, अन्य पंचायत मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT