Ravi Naik | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: 'प्रशासन तुमच्या दारी' उपक्रमानंतर मंत्री रवी नाईक यांचा धक्का

पुरवठा गोडाऊनला अचानक दिली भेट, बहुतांश कर्मचारी अनुपस्थित

Akshay Nirmale

Ravi Naik: कृषी आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी आज, शुक्रवारी अचानक पणजीतील गोडाऊनला भेट दिली. त्यांच्या या अचानक भेटीने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. दरम्यान, गोडाऊनला दिलेल्या भेटीप्रसंगी बहुतांश कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत मंत्री नाईक यांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला ४ वर्षे पुर्ण झाल्यासह केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पुर्ण होत आहेत. या निमित्त गोवा सरकारकतर्फे प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज, शुक्रवारी राज्यातील १२ ही मंत्री १२ तालुक्यात आहेत. उपजिल्हाधिकारी कार्यालयात या उप्रकमाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून राज्याचे कृषी, नागरी पुरवठा आणि हँडिक्राफ्ट मंत्री रवी नाईक हे तिसवाडी म्हणजे पणजीत होते. या उपक्रमानंतर मंत्री नाईक यांनी अचानक नागरी पुरवठा गोडाऊनला भेट द्यायची ठरवली आणि ते त्यासाठी गेले.

पण गोडाऊनमध्ये गेल्यावर त्यांनाच धक्का मिळाला. कारण तिथे बहुतांश कर्मचारी अनुपस्थित होते. त्यावरून उपस्थित कर्मचाऱ्यांना मंत्री नाईक यांनी जाब विचारला. याबाबत कडक कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: 16 ते 17 वर्षांची रखडपट्टी अन् आता गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्धाटनाला येणार नाही, मला लाज वाटते' VIDEO

Goa Crime: कुत्र्यांच्या भुंकण्याने चोरट्यांचा डाव फसला! सीसीटीव्ही अलर्टनंतर घरातील सदस्य जागे; पळणाऱ्या दोघांना स्थानिक तरुणांनी पकडले

Surla Farmers: सुर्लच्या 70 शेतकऱ्यांना तब्बल 2.90 कोटींची नुकसानभरपाई! गणेश चतुर्थीपूर्वी बळीराजाच्या हाती धनादेश; CM सावंत यांच्या हस्ते मदत

World Most Expensive Smartphones: जगातील 7 सर्वात महागडे फोन कोणते? पाहा संपूर्ण लिस्ट

Alpha Gen Protest: 'जेन-झी' पाठोपाठ आता 'अल्फा-जेन'ही हक्कांसाठी मैदानात! शिक्षकांच्या बदल्यांवर विद्यार्थ्यांचा वर्गबहिष्कार; सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला

SCROLL FOR NEXT