Sadetod Nayak : गोव्याला खरंच आयआयटीची गरज आहे का?

शिक्षणाचा मास्टर प्लॅन गरजेचा, जमीन वाचविण्याचेही आव्हान : उद्योजकांचे मत
Sadetod Nayak
Sadetod NayakDainik Gomantak

राज्यात असलेली जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. विकास करताना केवळ पन्नास नव्हे तर शंभर वर्षांचा विचार करावा लागणार आहे. असलेल्या जमिनीचा विनियोग करताना तो अत्यंत काळजीपूर्वक करावा लागेल.

आयआयटीसारख्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात जमीन लागते. गोव्यातून किती विद्यार्थी आयआयटीत प्रवेश घेतील, आम्हाला काय हवे आणि काय नको, हे ठरवावे लागेल, असे मत राज्यातील प्रख्यात उद्योजकांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी राज्यातील उद्योजक प्रशांत सरदेसाई आणि महेंद्र खांडेपारकर यांच्याशी चर्चा केली. फर्मागुढी- फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ठिकाणी आयआयटी आणावी आणि अभियांत्रिकी महाविद्यालय गोवा विद्यापीठ परिसरात न्यावे, अशी चर्चा पुढे आली.

Sadetod Nayak
Mopa International Airport : ‘मोपा’ला आंतरराष्ट्रीय विमानसेवेची प्रतीक्षाच

त्यामुळे सांगेत आयआयटी होईल की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याअनुषंगाने या कार्यक्रमात वरील मान्यवरांची मते जाणून घेण्यात आली.

"गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शंभर हेक्टरचा परिसर आहे. या परिसरात अगोदर अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, तेथे आता आयटीआय आले, त्यानंतर एनआयटी आली. आता एनआयटी तेथून कुंकळ्ळीला स्थलातंर होईल. परंतु त्या परिसरात आयआयटी आणण्यास जागा नाही. तेथे नवे विभाग निर्माण झालेले आहेत. एकतर खरा प्रश्‍न म्हणजे आयआयटीची गरज आहे का?"

- महेंद्र खांडेपारकर, उद्योजक

"एका नेत्याने फर्मागुढीत आयआयटी व्हावी, अशी अपेक्षा केली. राज्यात राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्था याव्यात. कोणतीही संस्था येण्यास विरोध नको? यापूर्वी गोव्यात कोकण रेल्वे, मोपाला विरोध झाला. पुढील पन्नास वर्षांचा विचार केला तर काय हवे काय नको ते ठरावे लागणार आहे."

- प्रशांत सरदेसाई, उद्योजक

Sadetod Nayak
GMC मध्ये कर्करोग रूग्णांसाठी OPD सुरू होणार तर राज्यात टाटांची संस्था; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

मान्यवर काय म्हणतात?

  • आयआयटी आणण्याचा विचार कोणत्या तत्त्वावर केला?

  • चांगल्या शैक्षणिक संस्था आणाव्यात.

  • जमिनीची कमतरता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन देणे अशक्य.

  • शाश्‍वत विकासाचा विचार अपेक्षित.

  • राजकारण्यांना किंवा सरकारला सल्ला देणाऱ्यांत तज्ज्ञांची कमतरता.

शिक्षणाचा दर्जा वाढवा

अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आयआयटी आणण्यास या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला असल्याचे सांगत खांडेपारकर म्हणतात, गोव्यात आयआयटी आली म्हणजे सर्वांना प्रवेश मिळेल, असे नाही. त्यासाठी प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.

आयआयटी हे प्रीमियर एज्युकेशन. केवळ हुशार मुले आयआयटीत जातात. आता धारवाडलाही आयआयटी झाली आहे. आता सर्व शहरांतून आयआयटी सुरू झाले आहे. ज्या संस्था आहेत, त्या शिक्षणाचा दर्जा का वाढविला जात नाही? असा सवाल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com