Goa Crime: कुत्र्यांच्या भुंकण्याने चोरट्यांचा डाव फसला! सीसीटीव्ही अलर्टनंतर घरातील सदस्य जागे; पळणाऱ्या दोघांना स्थानिक तरुणांनी पकडले

Marna Siolim Burglary Attempt: मध्यरात्री घरात घुसून चोरी करण्याचा दोन संशयितांचा प्रयत्न कुत्र्यांच्या सतर्कतेमुळे फसला.
Marna Siolim Burglary Attempt
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा/कळंगुट: मध्यरात्री घरात घुसून चोरी करण्याचा दोन संशयितांचा प्रयत्न कुत्र्यांच्या सतर्कतेमुळे फसला. मार्ना-शिवोली येथे घडलेल्या या घटनेत स्थानिक तरुणांनी धाडस दाखवत पळून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून त्यांना शाळेजवळ पकडले.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोघांनी स्थानिक रहिवासी कटरीना डिकुन्हा यांच्या घराच्या मागील बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते घराच्या पुढील बाजूस आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, स्क्रू-ड्रायव्हर आणि बॅग होती. घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून हालचाली लपविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र, कॅमेऱ्याच्या सेन्सरमुळे डिकुन्हा यांच्या मोबाईलवर सुरक्षा इशारा पोहोचला.

Marna Siolim Burglary Attempt
Goa Crime: पणजीत टॅक्सीचालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; दोन्ही हातांसह खांदा-पायाला दुखापत, एकास अटक तर मुख्य हल्लेखोर फरार

याचवेळी घरातील पाळीव कुत्र्यासह परिसरातील अन्य कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे घरातील सदस्य जागे झाले. दरवाजा उघडताच संशयितांनी तेथून पळ काढला. मात्र, मुख्य रस्त्यावर असलेल्या स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. शाळेच्या दिशेने धावणाऱ्या दोघांना काही अंतरावर घेरून पकडण्यात आले. घटनेची माहिती स्थानिक पंच विल्यम फर्नांडिस यांना देण्यात आली.

सुरक्षा इशारा!

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलताना चोरट्यांना आपण सुरक्षित असल्याचा भ्रम होता. मात्र, सेन्सरचा सुरक्षा इशारा आणि त्यानंतर कुत्र्यांनी केलेल्या भुंकण्यामुळे कुटुंबीय

जागे झाले. घराबाहेर पडलेल्या चोरट्यांचा स्थानिक तरुणांनी पाठलाग करून शाळेजवळ कोंडमारा केला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे चोरी अवघ्या काही मिनिटांत फसली.

Marna Siolim Burglary Attempt
Goa Coconut Price: गणेशोत्सवात नारळ महागला, पण ग्राहकांना मिळणार स्वस्तात! 70 हजार नारळांची खरेदी; राज्यभरातील 17 केंद्रांवर 38 रुपयांत विक्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com