Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik : मद्यनिर्मिती प्रकल्पाचे दूषित पाणी ओहोळात सोडल्याने रवी नाईक संतापले

कृषिमंत्र्यांचे कडक कारवाईचे संकेत; आरोग्य खात्याने दखल घेण्याची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Ravi Naik : कुर्टी - फोंड्यातील ऐन छठपूजेवेळी बेतोडा येथील मद्यनिर्मिती प्रकल्पातून अचानक दूषित पाणी ओहोळात सोडल्याने भाविकांची अतिशय गैरसोय झाली. दूषित पाणी त्यातच पाण्याला वेगळा दर्प आल्याने भाविकांचा गोंधळ उडाला. सकाळी पाणी स्वच्छ पण दुपारनंतर दूषित पाणी आल्याने भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे दूषित पाणी ओसरेपर्यंत भाविकांना ताटकळत रहावे लागले.

दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावलेले कृषिमंत्री रवी नाईक यांनी बेतोड्यातील मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या या कृतीची तपासणी आरोग्य खात्याने करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना केली.

नागझर - कुर्टी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात गेली दहा वर्षे छठपूजा उत्सव उत्तर भारतीयांतर्फे साजरा केला जातो. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम येथील महादेव मंदिर व परिसरात त्यानिमित्ताने आयोजित केले जातात. आज छठपूजेवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात धार्मिक विधी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश होता. संध्याकाळी सूर्याचे दर्शन घेऊन व अर्ध्य देऊन ही छटपूजा करण्यात आली.

या कार्यक्रमाला कृषिमंत्री रवी नाईक, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक उपस्थित होते. रवी नाईक यांनीही छटपूजेत सहभाग घेतला.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही छटपूजेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना गेली दहा वर्षे हा उत्सव साजरा केला जातो, पण दूषित पाण्याचा फटका लोकांना बसत असल्याने त्यावर योग्य कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. स्वागत सिद्धेश्‍वरनाथ मिश्रा यांनी केले.

यापूर्वीही मासे मरण्याचे प्रकार!

कुर्टी - फोंड्यातील या ओहोळात यापूर्वी मासे मरण्याचे प्रकारही घडले आहेत. बेतोड्यातील या मद्यनिर्मिती प्रकल्पातून अचानकपणे दूषित पाणी ओहोळात सोडले जाते, त्याचा विपरीत परिणाम या ओहोळातील जलचरांवर होत आहे. यापूर्वीही या ओहोळात असे दूषित पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने गोंधळ उडाला होता. याप्रकरणी फोंड्यातील आरोग्य खात्याने त्वरित हालचाली करून पाण्याचे नमुने घेऊन तसेच संबंधित मद्यनिर्मिती प्रकल्पातील दूषित पाणी सोडण्याच्या कृतीची तपासणी करण्याची जोरदार मागणी कुर्टीवासीयांनी केली आहे.

छठपूजेवेळी दूषित पाणी

बेतोडा येथील ओहोळात छठपूजेनिमित्त धार्मिक विधी केले जातात. मात्र, ऐन दुपारी अचानकपणे बेतोड्यातील मद्यनिर्मिती प्रकल्पातून दूषित पाणी ओहोळात सोडल्याने गोंधळ उडाला. सकाळी ओहोळाचे पाणी स्वच्छ होते. मात्र, दुपारी अचानक पाण्याचा रंग बदलला आणि विचित्र दर्पही या पाण्याला आला. त्यामुळे भाविक गोंधळले. त्याही स्थितीत त्यांनी पूजाविधी आटोपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT