Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: शिधापत्रिकेसाठी फक्त ६४ ऑनलाईन अर्ज; रवी नाईक

Online Ration Card Application: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी याविषयी प्रश्न विचारला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात शिधापत्रिकेसाठी आता ऑनलाईनच अर्ज स्वीकारले जातात. अशी सेवा उपलब्ध केल्यापासून आजवर केवळ ६४ जणांनी अर्ज केल्याची माहिती नागरीपुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी लेखी उत्तरात दिली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

नाईक यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सरकारने नवीन शिधापत्रिका देणे ७ जून २०२३ रोजी बंद केले होते. सरकारने या निर्णयाचा फेरआढावा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतला. त्यानंतर शिधापत्रिकांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आले. आता नवीन शिधापत्रिका मिळवणे, शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव जोडणे, पत्ता अद्ययावत करणे आदी कामांसाठीचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातात.

असे असले तरी शिधापत्रिकेची दुसरी प्रत मिळविणे, सदस्याचे नाव कमी करणे आदी कामे तालुका पातळीवरील कार्यालयात साधा अर्ज स्वीकारूनही केली जात आहेत, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT