Sal River Pollution Dainik Gomantak
गोवा

Sal River : धक्कादायक! 'साळ'चा समावेश सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये; नागरीकांची चिंता वाढली

राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिली माहिती

दैनिक गोमंतक

सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी असणाऱ्या साळ नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या नदीचा समावेश सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या श्रेणीत झाला असल्याची माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभा सभागृहात दिली आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून यामुळे सासष्टीतील नागरीकांची चिंता वाढली आहे.

(Minister of State for Environment Ashwini Kumar Choubey has informed that Sal river has been included in the most polluted rivers)

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा सदस्य लुइझिन्हो फालेरो यांनी साळ नदीच्या संदर्भात एक प्रश्न राज्यसभा सभागृहात राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांना विचारला होता. याची माहिती देताना या धक्कादाक बाबीचा खुलासा चौबे यांनी केला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उत्तर देताना म्हणाले की, 2018 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख कार्यक्रमा अंतर्गत (NWMP) नद्यांच्या पाणी विश्लेषणाच्या गुणवत्ता डेटाच्या निरीक्षण केले आहे. त्यानुसार ही बाब समोर आली आहे.

गुणवत्ता डेटाच्या आधारे 323 नद्यांवर 351 प्रदूषित नदीचे पट्टे असल्याचे समोर आले आहेत. यामध्ये साळ नदीचा समावेश वर्ग III मध्ये म्हणजेच (अत्यंत प्रदूषित नद्यांसाठी श्रेणी) झाला आहे. ही बाब चिंताजनक असून यामुळे साळ नदी पात्रालगतच्या नागरीकांची चिंता वाढणार आहे.

साळ नदी की गटार गंगा; मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी असलेली साळ नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. कारण मानवी मलमूत्र थेट नदीत सोडल्याने या नदीतील मासे खाणेही धोक्याचे बनले आहे. याबाबत सासष्टीसह संपुर्ण परिसरात नाराजीचा सुर उमटत आहे.

या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खारेबांध येथे दाखल होत, नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली आहे. यावेळी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी साळ नदीच्या प्रदुषण मुद्दा गांभिर्याने घेतला असल्याचे म्हटले आहे. तर नागरीकांनी साळ नदी की गटार गंगा? अशा शब्दात तीचे वर्णन केले आहे. यातच या नदीचा समावेश सर्वाधिक प्रदुषित नदीमध्ये झाल्याने हा मुद्दा आता वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT