संपूर्ण सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी असलेली साळ नदी सध्या पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. मानवी मलमूत्र थेट नदीत सोडून दिल्याने या नदीतील मासे खाणेही धोक्याचे बनले आहे. याबाबत सासष्टीसह संपुर्ण परिसरात नाराजीचा सुर उमटत आहे.
(Chief Minister Pramod Sawant has inspected Sal River pollution)
या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खारेबांध येथे दाखल होत, नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, साळ नदीच्या प्रदुषणाची सध्य स्थिती याची पाहणी आज केली आहे. याच्या उपायांबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे.
प्रदूषण समस्या कोणत्या प्रकारे समुळ नष्ट करता येईल याबाबत आराखडा तयार केला जाईल, नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार व्हिएगस देखील या दौऱ्यावर होते.
काय आहे साळ नदीची समस्या?
वेर्णापासून बेतूलपर्यंत वाहणारी साळ ही सासष्टी तालुक्यातील महत्त्वाची नदी आहे. ही नदी सध्या प्रदूषणाच्या गर्तेत अडकली आहे. नदीचे पात्रातील पाणी पुर्णत: गढुळ झाले असून मैला मिश्रीत पाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. त्यामूळे या नदीतील पाणी आणि मासे वापरावे की नाही? यावरुन नागरिक सवाल खडे करतायेत. या नदीच्या काठावर मुख्यतः मासेमारी करणारा समाज रहात असून याच नदीच्या माशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामूळे ही समस्या आता वाढत असल्याचे चित्र आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.