Nitin Gadkari, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari In Goa: लोकांची नाराजी जाणून घ्या; गडकरींचा मास्टरक्लास

Goa BJP: प्रदेश विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत ४० मिनिटे ‘ब्रेनवॉश'

गोमन्तक डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीत २७ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाल्याने २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत २७ जागा मिळतील, अशी समीकरणे मांडणाऱ्या प्रदेश भाजपला आरसा दाखविण्याचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. त्यांनी सुमारे ४० मिनिटे फटकेबाजी करत अनेकांना चिमटे काढले.

ताळगाव येथील समाज सभागृहात आज झालेल्या प्रदेश विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बोलताना त्यांनी ही मास्तरकी केली. यावेळी मंचावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांच्या समक्ष गडकरी यांनी खडे बोल सुनावत नेते-कार्यकर्त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली.

केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव

यावेळी केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मांडला. त्याला वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी करणारा राजकीय ठरावही संमत करण्यात आला.

२०२७ मध्ये भाजपच सत्तेवर

इंडिया आघाडीच्या गोव्यातील नेत्यांमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठी भांडणे सुरू आहेत. काहींनी तर आतापासूनच खात्यांचेही वाटप केले आहे. त्यांच्याकडून भाजप नेत्य‍ांना आपल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण त्यांचे प्रयत्न कधीच सफल होणार नाहीत. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला प्रचंड बहुमताने निवडून आणतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

२७ जागा जिंकणे शक्य

तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपला २७ मतदारसंघांत आघाडी मिळाली होती, तर दोन मतदारसंघांत अवघ्या काही मतांनी आघाडी निसटली. याचा अर्थ २७ जागा जिंकणे शक्य आहे. आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे जात राहिले पाहिजे. जनतेशी संवाद साधत त्यांच्‍या आशा-आकांक्षा जाणून घेतल्या पाहिजेत.

सरकारचे होणार ऑडिट

गडकरी य‍ांनी दिलेले सल्ले कार्यकर्त्यांआधी सर्व मंत्री, आमदारांनी पाळणे गरजेचे आहे. मतदारराजा सर्वश्रेष्ठ मानून सर्वांनी काम केले तर २०२७ मध्ये २७ आमदार निवडून आणण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मंत्री गडकरी यांच्या निर्देशांनुसार राज्य सरकारच्या कामकाजाचे ऑडिट करण्यात येईल, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

नेत्यांचे कर्मच ठरवणार पक्षाचे भवितव्य

भाजपच्या स्थानिक नेत्यांचे कर्मच (काम) भाजपचे पुढील निवडणुकीतील भवितव्य ठरेल. कॉंग्रेसने केलेल्या चुका केल्यास कॉंग्रेसच्या वाट्याला जे आले ते येण्यास वेळ लागणार नाही, असे सडेतोड वक्तव्य त्यांनी केले. भाजप हा इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा पक्ष आहे, हेही त्यांनी समजावून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT