Minister Nilesh Cabra And MLA Pernem Pravin Arlekar  Dainik Gomantak
गोवा

Video: 'ए प्रविण, डेप्युटी कलेक्टर कोण तो खबर ना? मंत्री काब्राल आमदारावर भडकले, उपजिल्हाधिकाऱ्यालाही सुनावले

मंत्री काब्राल या व्हिडिओमध्ये पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहेत.

Pramod Yadav

राज्याचे बांधकाम आणि पर्यावरण मंत्री निलेश काब्राल (Minister Nilesh Cabral) पेडणे येथील दौऱ्यावर असताना घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंत्री काब्राल या व्हिडिओमध्ये पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर (MLA Pravin Arlekar) यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहेत, याशिवाय त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना देखील फैलावर घेतले आहे.

मंत्री निलेश काब्राल यांनी उपजिल्हाधिकारी कोण माहिती नाही का? असे म्हणत आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर भडकल्याचे दिसत आहे. 'ए प्रविण, डेप्युटी कलेक्टर खबर ना कोण तो? आ??? लाय मरे ताका फोन' असे म्हणत काब्राल आर्लेकर यांच्यावर भडकले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तसेच, फोन लावल्यानंतर मंत्री काब्राल उपजिल्हाधिकारी यांना देखील खडेबोल सुनावताना दिसत आहेत. काब्राल यांना हवी असलेली माहिती आजच उशिरापर्यंत त्यांना देण्यात यावी अशा शब्दात काब्राल यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावले.

तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार

बांधकाम मंत्री निलेश काब्राल पेडणे दौऱ्यावर असताना त्यांना चांदेल प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चांदेल प्रकल्पासाठी आवश्यक असलेली टाकी उभारण्यासाठी जमीन मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत पाण्याची समस्या सोडवू असे आश्वासन दिले. अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी ग्वाही काब्राल यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT