Minister Mauvin Godinho interacting with citizens at Curtorim Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho : नोंदणीकृत स्‍वयंसहाय्‍य गटांतील महिलांसाठी खुशखबर

पंचायत मंत्री गुदिन्‍हो यांची घोषणा: कुडतरी आणि नावेली मतदारसंघाचा दौरा

सुशांत कुंकळयेकर

Mauvin Godinho : स्वयंसहाय्य गटांशी संलग्नित असलेल्या महिला विक्रेत्यांकडून पंचायत क्षेत्रात जी विक्री केली जाते त्यांच्याकडून सोपो कराची वसुली केली जाऊ नये ही मागणी आल्याच्या पार्श्वभुमीवर अशा नोंदणीकृत स्वयंसहाय्य महिला गटांकडून सोपो न घेण्याचे आदेश जारी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली.

कुडतरी व नावेली मतदारसंघात भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी पंचायत सदस्यांना व विविध पंचायतींना भेट दिली. कुडतरी येथील जनसंपर्क मोहिमेच्यावेळी भाजप एसटी मोर्चा उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा, महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यानंतर कोणकोणती विकासकामे केली, याची माहिती देणारी पुस्तिका प्रदान - करण्यात आली. काही पालिका व पंचायतींकडून स्वयंसहाय्य गटांकडूनही सोपो कर गोळा केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

यानंतर खात्यातील अधिकाऱ्यांना स्वयंसहाय्य गटांकडून सोपो कराची वसुली करण्यात येऊ नये, यासाठी संबंधित स्वराज्य संस्थांना याबाबत सूचना करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यास सांगितले आहे. नोंदणीकृत स्वयंसहाय्य बचत गट हे सोपो कराच्या अधिकारातून वागण्यात यावेत, असे आदेश दिलेले आहेत असे त्यांनी सांगितले.

महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न राज्य सरकार करत आहे. त्यानुसार महिला स्वयंसहाय्य गटांना सोपो कर लावण्यात येणार नाही, असेही मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT