Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino : कॅसिनोंसाठी 28 टक्केच जीएसटी

मंत्री माविन गुदिन्हो यांचं स्पष्टीकरण; कायदेशीर सल्ला घेणार असल्याचीही माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Casino : ऑनलाईन गेमिंगसंदर्भात नुकतीच देशातील मंत्र्यांची गट जीएसटी मंडळ बैठक पार पडली. या वेळी घोड्यांच्या शर्यती जुगारात नव्याने कलम घालून गॅम्बलिंगचा उल्लेख झाला आहे. गॅम्बलिंग या शब्दामुळे कॅसिनोचा सहभाग होतो. त्यामुळे ॲटर्नी जनरलांचा कायदेशीर सल्ला घेऊन पुन्हा फाईल जीएसटी आयोगाकडे पाठवून शिफारस केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या जुगारासाठी 28 टक्के जीएसटी निश्‍चित असेल, अशी माहिती राज्याचे जीएसटीसाठी बैठकीत प्रतिनिधित्व करणारे मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मंत्र्यांच्या गट जीएसटी मंडळ बैठकीत घोड्यांच्या शर्यती, कॅसिनो व ऑनलाईन गेमिंग या तीन विषयांवर चर्चा सुरू आहे. त्यासाठी काहीजण बंगळुरू येथे घोड्यांच्या शर्यतीवरील जुगार पाहण्यासाठी गेले तर काहीजण गोव्यात कॅसिनो जुगार पाहण्यासाठी आले होते. यामधील काही असलेल्या त्रुटींसंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे.

यापूर्वीही कॅसिनोंसाठी 15 टक्के मनोरंजन कर व इतर कर मिळून कर लादण्यात येत होता. कॅसिनोंसाठी आकारण्यात येत असलेल्या कराबाबत कोणताच वाद नाही, तर घोड्यांच्या शर्यतीवरील जुगाराबाबत काही राज्यांनी प्रश्‍न उपस्थित केल्याने नव्याने कलम त्यात लागू केले आहे. मात्र, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी गॅम्बलिंगचा उल्‍लेख केल्याने त्यात कॅसिनोही आले. याला हरकत घेण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय झाला आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

‘ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू’नुसार कर आकारावा

कॅसिनोंसाठी 28 टक्के कर लादण्याबाबत कोणताच वाद नाही व कॅसिनो व्यावसायिकांचाही विरोध नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याप्रकारे कॅसिनोंसाठी कर आकारला जातो तीच पद्धत अवलंबण्यात यावी. या कॅसिनोंसाठी ‘ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू’नुसार हा कर आकारण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. ही पद्धत जगभर अवलंबिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gen Z Jantar Mantar Protest: ताठर सरकार अन्‌ युवकांचा निर्धार

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

खरी कुजबूज: बोरकर 'त्या' व्हिडिओवर गप्प का?

Horoscope: शिवकृपेने खुलणार यशाचे दरवाजे! 'या' राशींसाठी सोमवार ठरणार अत्यंत शुभ; सुख, समृद्धी सह प्रत्येक कार्यात मिळणार यश

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

SCROLL FOR NEXT