Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

Minister Govind Gawade: सुरक्षा लेखापरीक्षण केल्याशिवाय कला अकादमीचे लोकार्पण नाही 

विरोधकांची टीका फक्त वैयक्तिक आकसातून

गोमन्तक डिजिटल टीम

Minister Govind Gawade: कला अकादमीचा सुरक्षेचा प्रश्‍न आता ऐरणीवर आल्याने तिच्या सुरक्षेचे संपूर्ण लेखापरीक्षण केले जाईल.

जोपर्यंत अकादमीच्या सुरक्षा लेखरपीक्षणाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कला अकादमीचे लोकार्पण करणार नसल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

ते ‘गोमन्तक टीव्ही’वर संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

मागील अनेक वर्षांत कला अकादमीची अनेकदा डागडुजी करण्यात आली तसेच आता पुनर्बांधणीसाठी जेवढा खर्च झाला त्यात नव्याने कला अकादमीची उभारणी झाली असती.

ज्यावेळी मी पुनर्बांधणीबाबत वाच्यता केली त्यावेळी अनेकांनी मला विरोध केला. अनेकांच्या टिकेला मला सामोरे जावे लागल्याचे गावडे यांनी सांगितले.

मी कला आणि संस्कृती खात्याचा मंत्री म्हणून अकादमीचा अध्यक्ष या नात्याने चालत असलेल्या कामकाजाची पाहणी केली. कला अकादमीची पुनर्बांधणी तसेच त्यापूर्वीची अकादमीची अवस्था कशी होती याची छायाचित्रे व व्हिडिओदेखील माझ्याकडे आहेत.

माझ्यावर विरोधी राजकीय पक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. जर या पुनर्बांधणीत माझा सहभागच नाही तर भ्रष्टाचाराचा प्रश्‍नच कसा उपस्थित होतो? पुनर्बांधणीचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत आहे. ते त्यांच्या अखत्यारित आहे.

तरीदेखील विरोधी राजकीय पक्ष माझ्यावर टीका करत आहेत. एखादे विधान करताना तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचे गावडे यांनी सांगितले.

सखोल चौकशी व्हावी

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्यामागचे कारण काय? याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच यात दोषी असणाऱ्यांवर कारवाईदेखील व्हावी.

आता जे या इमारतीचे सुरक्षा लेखापरीक्षण होणार आहे ते आयआयटी मद्रास करेल. त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे, असे गावडे यांनी सांगितले.

मला गोव्यातील कलाकारांच्या भावना माहीत आहेत. मी एक कलाकार म्हणून तसेच कला अकादमीचा अध्यक्ष म्हणून अनेकदा या कामाची आत्मीयतेने पाहणी केली आहे. मी जनतेच्या समस्या ऐकतो म्हणूनच मला डिवचले जातेय. अकादमीचे लोकार्पण करण्यापूर्वी अशी घटना घडली त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे आता इमारतीच्या सुरक्षेची चाचपणी करणे गरजेचे आहे.
गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

SCROLL FOR NEXT