Govind Gawade  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: 'एसटी' समुदायाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद केवळ 'UTAA'मध्येच; गोविंद गावडे यांचा विश्वास

एसटी समुदायात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप; मडगावात प्रेरणादिन कार्यक्रम

Akshay Nirmale

Minister Govind Gaude on ST Reservation: आदिवासी कल्याण संचालनालय व युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स (उटा) या संघटनेने आदिवासी समाजासाठी बलिदान दिलेल्या स्व. मंगेश गावकर व स्व. दिलीप वेळीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मडगावच्या रवींद्र भवन सभागृहात प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते.

त्‍यावेळी उटा संघटना व एसटी समाजामध्ये फूट पाडली जात आहे, असा आरोप करत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जोरदार समाचार घेतला.

‘काही लोक बलिदानाप्रति शोक प्रकट करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. पण, शोक प्रकट करणे म्हणजे एसटी समाजाच्या विकासाला खिंडार पाडणे नव्‍हे. आम्ही येथे समाजातील युवकांना या दोघांनी दिलेल्या बलिदानातून प्रेरित होऊन समाजाला उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी जमलो आहोत’, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.

‘उटा संघटना व एसटी समाजामध्ये मुळीच फूट पडलेली नसून अफवा पसरविणाऱ्यांचा तो केवळ भ्रम आहे. केवळ उटा संघटनेमध्येच एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद आहे’, असे गावडे यांनी आवर्जून सांगितले.

‘काही लोक समाजातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे कोण फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्‍यात त्यांचा स्वार्थ आहे, त्यांचा छुपा अजेंडा आहे. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे.

उटा संघटनेतील एक नेता गेला म्हणून संघटनेमध्ये किंवा समाजात फूट पडली असा त्याचा अर्थ होत नाही’, असेही गावडे यांनी सांगितले.

मंत्री सुभाष फळदेसाई यांचा पाठिंबा
मंत्री गावडे यांनी उटा संघटनेमध्ये व एसटी समाजामध्ये फूट पाडण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना सावधानतेचा इशारा दिला. केवळ उटा संघटनेमध्येच एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ताकद आहे. आम्ही उग्र आंदोलन वगैरे करणार नाहीत.

आम्ही बुद्धी, शक्ती व बळाच्या जोरावर आमच्या मागण्या मान्य करून घेऊ, असेही ते म्‍हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

मतभेद विसरून एकत्रितपणे काम करा : मुख्‍यमंत्री सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आदिवासी कल्याण खात्याची जबाबदारी आहे. मात्र, नवी दिल्लीला जावे लागल्याने ते आदिवासी कल्याण खाते व उटा संघटनेने आयोजित केलेल्या प्रेरणादिन कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.

मात्र त्यांनी नवी दिल्लीहून संदेश देणारा आपला व्हिडिओ पाठवला. तो सर्व उपस्थितांना ऐकविण्यात आला. सर्व एसटी बांधवांनी आपल्यामधील मतभेद विसरून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.


जळीतकांडाच्‍या निकालाला हाय कोर्टात देणार आव्‍हान
बारा वर्षांपूर्वी बाळ्‍ळी येथे झालेल्‍या आंदोनलनावेळी एसटी युवा कार्यकर्ते मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या दोघांना जाळून मृत्‍यू झाला होता. या प्रकरणात तपास करणाऱ्या ‘सीबीआय’ने दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात दाखल केलेल्‍या खटल्‍यातून सर्व संशयित निर्दोष मुक्‍त झाले होते.

एवढे महत्त्वाचे प्रकरण असतानाही राज्‍य सरकारने या निवाड्याला उच्‍च न्‍यायालयात अद्याप आव्‍हान दिलेले नाही.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्‍यक्ष दीपक करमळकर यांनी या निवाड्याला सरकारकडून उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात यावे यासाठी आयोग स्वतः प्रयत्‍न करेन, असे मडगाव येथील श्रद्धांजली कार्यक्रमात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT