Vedanta Mining Dispute Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining Issue: आंदोलन मिटेना! ‘वेदांता’ कंपनीचा प्रस्ताव अमान्य; 'खनिज वाहतूक'प्रश्नाचे घोंगडे भिजत

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतूक कधी सुरू होणार याची खाणीवरील कामगारांसह ट्रकमालकांना प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी आंदोलन अजूनही मिटत नाही. ‘वेदांता’ कंपनीचा प्रस्ताव कामगारांना मान्य नाही. त्यामुळेच डिचोलीतील आंदोलनप्रश्नी ‘सुवर्णमध्य’ निघत नाही अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vedanta mining dispute pilgao farmers protest bicholim

डिचोली: खनिज वाहतूक कधी सुरू होणार याची खाणीवरील कामगारांसह ट्रकमालकांना प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी आंदोलन अजूनही मिटत नाही. ‘वेदांता’ कंपनीचा प्रस्ताव कामगारांना मान्य नाही. त्यामुळेच डिचोलीतील आंदोलनप्रश्नी ‘सुवर्णमध्य’ निघत नाही अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

आमची शेती आम्हाला द्या. तसेच कपात केलेल्या कामगारांना सेवेत घ्या, अशी मागणी पुढे करून शेतकऱ्यांसह कामगारांनी ‘वेदांता’च्या खाणीवरील रस्ता अडवला आहे. परिणामी गेल्या सतरा दिवसांपासून खाणीवरील खनिज वाहतूक ठप्प झाली आहे. याप्रश्नी गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांनी दिलेला कंपनीचा प्रस्तावही शेतकरी आणि कामगारांना मान्य नाही. रस्त्यासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि कपात केलेल्या कामगारांना १५ दिवसांचा अतिरिक्त कपात लाभ देण्यास कंपनी तयार आहे. मात्र, या प्रस्तावाबाबतीत कामगार आणि शेतकरी समाधानी नसल्याचे समजते. आंदोलन प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आठवड्यापूर्वी प्रशासकीय पातळीवरील एक संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीतही कंपनीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य झाला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kashmir Temple: 35 वर्षानंतर उघडले पुरातन मंदिर! 1990 साली दहशतवादामुळे केले होते बंद; मुस्लिम समुदायाने घेतला सहभाग

Goa Rain: गोमंतकीयांनो सावधान! चतुर्थी झाली तरीही पाऊस जाईना... हवामान विभागाकडून 'ऑरेंज' अलर्ट जारी

Adpoi Ganesh Visarjan: ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल'! आडपई गावची आगळीवेगळी गणपती विसर्जन परंपरा; Watch Video

अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक विक्रीच्या नोंदींत फेरफार; फोंडा येथील फार्मसीचा परवाना निलंबित

Ganesh Festival: 60 - 70 च्या दशकातला उत्सव, सध्याचे बदललेले स्वरूप; 'गणेशोत्सवा'चा मूळ हेतूच हरवलाय का?

SCROLL FOR NEXT