Goa Mining Update Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: पावसाळ्यापूर्वी 5 खाणपट्ट्यांचा होणार लिलाव! खाण खात्याची तयारी, 2 ठिकाणी उत्खनन सुरू

Goa Mining Auction: खात्याने आजवर १२ खाणपटट्यांचा (२४ परवाने समूहांचा) लिलाव पुकारला आहे. त्यापैकी ७ खाणपट्यांना पर्यावरण दाखले मिळाले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: खाण खाते आणखीन पाच खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. पावसाळ्यापूर्वी हा लिलाव पुकारून पावसाळ्यात संबंधित कंपन्यांना आवश्यक ते परवाने मिळवण्यासाठी वेळ द्यावा, असा खात्याचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे.

खात्याने आजवर १२ खाणपटट्यांचा (२४ परवाने समूहांचा) लिलाव पुकारला आहे. त्यापैकी ७ खाणपट्यांना पर्यावरण दाखले मिळाले आहेत. त्यातील दोन ठिकाणी प्रत्यक्षातील खाणकामही सुरू झाले आहे.

कुडणे- करमळी, सुर्ल सोनशी, थिवी पीर्ण, डिचोली- मुळगाव, कोडली व इतर ठिकाणच्या खाणपट्टा समूहांचा लिलाव यशस्वीपणे पार पाडण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या लोखंडाच्या नऊ लोह खाण परवान्यांपैकी संभाव्य खनिज पट्टे निश्चित करून त्यांचा लिलाव करण्याच्या तयारीत ही यंत्रणा आहे. आजवरचे खाणपट्टे देशातील नामवंत कंपन्यांनी मिळवले आहेत.

यामध्ये जेएसडब्ल्यू स्टील, काई इंटरनॅशनल (ओडिशा), अगरवंशी स्टील कॉर्पोरेशन (तेलंगणा), वेदांता लिमिटेड, फोमेंटो रिसोर्सेस, सालगावकर शिपिंग आणि एनएस बांदेकर यांसारख्या गोवा व इतर राज्यांतील कंपन्यांचा सहभाग आहे. एकूण ८ प्रमुख कंपन्यांनी या लिलावांमध्ये बाजी मारली आहे.

वेदांता लिमिटेड ही पहिली कंपनी ठरली जिने डिचोली खाण पट्ट्यात खाणकाम सुरू केले आहे. तसेच, जेएसडब्ल्यू स्टील, फोमेंटो रिसोर्सेस यांच्यासह काही कंपन्यांना देखील पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झालीआहे.

राज्यातील खाण व्यवसायाला गती देण्यासाठी आणि गोव्याच्या आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी हे लिलाव महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. आगामी काळात आणखी खाणपट्ट्यांचे लिलाव होणार असून, यामुळे स्थानिक रोजगार, उद्योगधंदे आणि राज्याच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य ठळक बाबी

२०२३ पासून आतापर्यंत १२ खनिज पट्टे

(२४ खाण परवाने) लिलावात.

७ पट्यांना पर्यावरणीय मंजुरी; २ ठिकाणी खाणकाम सुरू.

वेदांता लिमिटेडने डिचोली खाणीचे काम सर्वप्रथम सुरू केले.

८ प्रमुख कंपन्यांचा सहभाग – देशातील व गोव्यातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: गोवा सरकारने साळगाव पोलिस स्टेशनचे अधिकार क्षेत्र केले अधिसूचित

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

SCROLL FOR NEXT