Goa Mining Case Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: मये गावातील खनिज वाहतूक अखेर बंद

Goa Mining Case: मयेतील खनिज वाहतूक अखेर बंद झाली आहे. ग्रामस्थांनी काल ही खनिज वाहतूक होणार काय याची वाट पाहिली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: मयेतील खनिज वाहतूक अखेर बंद झाली आहे. ग्रामस्थांनी काल ही खनिज वाहतूक होणार काय याची वाट पाहिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शिरगाव येथील 5 हजार 900 मेट्रिक टन लोह खनिज दिवसाला 50 ट्रक फेऱ्यांतून नेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.

त्यानुसार 12 दिवसांत हे काम होणे अपेक्षित होते. मये ग्रामस्थांनी मये गावातून जाणारे खनिजवाहू ट्रक अडवल्यानंतर हा विषय तापला होता. मयेतील मुळाक खाजन शेतकरी संघटनेने हा विषय उच्च न्यायालयात पोचवला होता. न्यायालयाने आहे हे खनिज गावातून नेण्यास परवानगी देताना मयेतूनच नव्हे, तर कोणत्याही गावातून खनिज वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे.

शिरगावमधील खनिज 12 फेब्रुवारीपर्यंत ब्ल्यू ग्लोब कंपनी नेईल असे ग्रामस्थांना वाटत होते. ते दररोज ट्रकच्या फेऱ्या मोजायचे आणि वाहतूक परवान्याची तपासणीही करायचे. आता खनिज वाहतूक करायची असल्यास ती गावाबाहेरून करावी लागणार आहे. तसा आराखडा न्यायालयात खाण खात्याला सादर करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT