गोवा

'दूधसागर'च्या खनिजमिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी नागरिकांनी केली चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक

फोंडा; दूधसागर नदीत संधी साधून खनिजमिश्रीत गाळयुक्त पाणी सोडले जात असल्याने ओपा जल प्रकल्पावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. आठवड्याभरापूर्वी नदीचे पाणी लाल झाले होते. खनिजमिश्रीत पाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी लाल झाल्याने बऱ्याच ठिकाणी ऐन चतुर्थीत गढूळ लाल पाणी नळांना येण्याचा प्रकार घडला होता. आज (मंगळवारी) सकाळी कोडली भागातील दूधसागर नदीच्या पात्रात गढूळ खनिज माल मिश्रीत लाल पाणी सोडल्याने खळबळ उडाली होती.

(Mineral mixed water in Dudhsagar river endangers the health of citizens)

कोडली भागात हे लाल पाणी दिसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करीत सरकारी यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दूधसागर नदीचे हे लाल पाणी पुढे खांडेपार नदीला मिळत असल्याने त्याचा विपरित परिणाम ओपा जल प्रकल्पावर होत असल्याने लाल पाणी नळांना येण्याचा प्रकार घडत असल्याने नळाचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

खाण प्रकल्पातूनच हे गढूळ पाणी सोडले जात असल्याचा संशयही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेने या प्रकरणी त्वरित लक्ष घालून खनिज मिश्रीत लाल पाणी नदीच्या पात्रात सोडण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी तथा आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT