Birsa Munda biopic film Dainik Gomantak
गोवा

चंदेरी दुनियेत मंत्री तवडकरांची एन्ट्री! 'उलगुलान' चित्रपटात साकारली 'मुखिया'ची भूमिका; फोटोवरून चर्चा

Ramesh Tawadkar Ulgulan movie: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त, गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाने एक विशेष चित्रपट तयार केला

Akshata Chhatre

काणकोण: आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त, गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाने एक विशेष चित्रपट तयार केला आहे.

'उलगुलान' नावाचा एक तासाचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, यात आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी 'मुखिया'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनेक आदिवासी समाजाचे कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे, ज्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

कला व संस्कृती खात्याची निर्मिती

झारखंडमधील आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याने केली आहे.

  • दिग्दर्शन: साईनाथ परब

  • संगीत: मुकेश घाटवाळ

  • संपादन: ब्रिजेश घाटवाळ

या चित्रपटात केवळ मंत्री तवडकरच नव्हे, तर कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक आणि उपसंचालक मिलिंद माटे यांनीही अभिनय केला आहे.

मुंडांच्या २८ वर्षांच्या कार्याचे दर्शन

आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, या चित्रपटामागे भगवान बिरसा मुंडा यांचे २८ वर्षांचे संघर्षमय कार्य दर्शवण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची माहिती तळागाळातील समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा या निर्मितीचा उद्देश आहे. बिरसा मुंडा, जे केवळ २५ वर्षे जगले, त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध एक शक्तिशाली आंदोलन उभे केले होते.

त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी 'बिरसायत' नावाचा स्वतःचा धर्म स्थापन केला. ते आजही "जल, जंगल, आणि जमीन" या आदिवासी अस्मिता आणि प्रतिकाराच्या घोषणेचे प्रतीक मानले जातात. केंद्र सरकारने देशभरात बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी केली, याच राष्ट्रीय उत्सवाचा समारोप या 'उलगुलान' चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT