mauvin godinho Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: ‘तो’ मी नव्हेच! स्‍वकियांची विरोधकांना फूस : माविन

कथित सेक्‍स स्‍कँडल प्रकरणाची सखोल तपासाची मागणी

दैनिक गोमन्तक

Min Mauvin Godinho On Goa Politician Scandal: कथित सेक्स स्कँडल प्रकरणाविषयी उठलेल्या वादळावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी ‘तो मी नव्हेच’ असे सांगत आपली बाजू स्‍पष्‍ट केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला सोमवारी गुदिन्हो यांनी ही मुलाखत दिली.

सेक्स स्कँडल प्रकरणात आपले नाव आल्याचे लोकांकडूनच समजले. गिरीश चोडणकर यांनी समाज माध्यमांतून वृत्ताचे जे कात्रण जोडले, ते कोणत्या वृत्तपत्रातील ते माहीत नाही.

परंतु ते जरी माझे नाव त्यात नसल्याचे सांगत असले तरी जनतेला ‘तो’ मंत्री म्हणजे माविनच आहे असे वाटू लागले आहे. जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, ते भाजपमय झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे जुन्या पक्षाशी संबंध असू शकतात.

आवाजाची बनावट ऑडिओ क्‍लीप!

मुलाखतीत माविन म्‍हणाले, काही जणांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून माझा हुबेहूब आवाज क्‍लोन करण्‍याचा प्रयत्‍न होत आहे.

अशा प्रयत्‍नातूनच माझ्‍या आवाजात बनावट ऑडिओ क्‍लीप बनवून मला अडचणीत आणण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनीही या संदर्भात मला सूचित केले आहे.

"मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. त्याशिवाय सर्व मंत्र्यांचे ते पालक आहेत. आम्ही त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे आणि त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी आपली मागणी कायम आहे."

गिरीश चोडणकर, सदस्य, केंद्रीय काँग्रेस कार्यकारिणी

माविन गुदिन्हो म्‍हणतात...

  • ज्याने आपल्याविरुद्ध हे षड्‌यंत्र रचले आहे, तो ते भोगेल. पोलिस आपले काम करीत आहेत, परंतु मुख्यमंत्री दिल्लीवरून गोव्यात आल्यानंतर या प्रकरणाविषयी आपण त्यांना भेटणार आहोत.

  • चोडणकर यांनी जे समाज माध्यमांतून ट्विट केले आहे, तो एक फार्स असू शकतो. आता ते या प्रकरणातून हात वर काढत आहेत.

  • गिरीश चोडणकर हे एकतर खोटे बोलत आहेत किंवा त्यांना कोणाचा पाठिंबा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT