Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: भाडेकरू पडताळणी मोहीमेत 11 परप्रांतीय कामगारांवर कारवाई

मोहिमेदरम्यान सुमारे 200 लोकांची तपासणी केली गेली.
Published on

Goa Police: आज सोमवारी हणजूण पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भाडेकरुंची पडताळणी मोहीम राबवली.

यात शिवोली परिसरातील भाडेतत्त्वावरील देण्यात आलेल्या खोल्यांची तपासणी करण्यात आली. यातील काही खोल्या ह्या भाडेकरूंना कागदपत्रांशिवाय देण्यात आल्याचे निदर्शनाला आले.

Goa Police
Vasco Janata Darbar: ''मी दरबारात साष्टांग नमस्कार घालून पाया पडतो''; 'त्यांची' आर्त विनवणी आणि मंत्री झाले निरुत्तर, घडलं असं की...

मोहिमेदरम्यान सुमारे 200 लोकांची तपासणी केली गेली. यातील सुमारे 25 जणांकडे भाड्याने राहत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. कागदपत्रांशिवाय सापडलेल्या 11 जणांवर कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Goa Police
Goa Fire: कोलवाळ पुलावर कार जळाली, आगीचे कारण अस्पष्ट

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी आणि एसपी निधिन वलसन (आयपीएस,)यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने पीएसआय साहिल वारंग आणि हणजूण पोलीस स्टेशनचे इतर बीट कर्मचारी यांनी ही भाडेकरू पडताळणी मोहीम राबवली.

यावेळी 'आवश्यक सुरक्षा उपायांसाठी अंजुना पोलिसांनी सर्व नागरिकांना त्यांचे भाडेकरू पडताळणी फॉर्म त्वरित सबमिट करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com