Farm Burning Dainik Gomantak
गोवा

नागझर येथील घटनेने शेतकऱ्यांचे झाले लाखोंचे नुकसान

नागझर येथील घटना: शेतकऱ्यांवर मोठे संकट

दैनिक गोमन्तक

मोरजी: नागझर-पेडणे येथे ऊसाच्या मळ्याला आज शनिवारी दुपारी लागलेल्‍या आगीत सुमारे 22 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दल पोचण्यापूर्वीच शेती पूर्णपणे जळून गेली.

नागझर परिसरात तिळारी नदी कालव्याच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांनी ऊस, केळी, मिरची आदींची शेती केली होती. आज दुपारी अचानक या शेतीच्या मळ्यांना आग लागली. त्‍यात सर्व शेती नष्ट झाली. शेतकरी आपल्या घरी जेवायला गेल्यानंतर अचानक आग लागल्याने ती विझवण्यासाठी कोणीच नव्हते.

शेतकऱ्यांना जेव्हा माहिती कळली तेव्‍हा त्‍यांनी तात्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली, पण काही उपयोग झाला नाही. पूर्णपणे जळून गेलेली शेतीच त्‍यांच्‍या नजरेस पडली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्‍यामुळे शेतकरी हतबल झाले. कोणीच प्रतिक्रिया द्यायच्‍या मन:स्थितीत नव्हता.

शेतीला संरक्षण मिळावे म्हणून सरकारमार्फत योजनेअंतर्गत तारेचे कुंपण घालण्‍यात आले होते. तरीही दुर्घटना घडलीच. परिणामी 22 शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गतसाली अशीच आग लागून नुकसानी झाली होती. मात्र सरकारकडून अजूनपर्यंत काहीच नुकसानी मिळालेली नाही. यावेळी तरी सरकारने वेळीच पावले उचलून नुकसानग्रस्‍त शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जमिनी गेल्या, आता उत्पन्नही गेले!

नागझर येथील या शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्‍पांसाठी मोठ्या प्रमाणात गेल्‍या आहेत. त्‍यात मोपा विमानतळ आणि लिंक रोड प्रामुख्‍याने सामावेश होतो. राहिलेल्‍या जमिनींत शेतकऱ्यांनी शेती केली होती. तेच उत्पन्न आता आगीने खाक झाल्‍याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. सरकारने आपल्‍याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

Viral Post: हद्दच झाली राव! नोकरीसाठी अर्जच केला नाही, पण कंपनीकडून आला थेट 'रिजेक्शन मेल'; जॉब मार्केटची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

खरी कुजबुज: 'जेन झी'ला गृहीत धरू नका!

Golden Peacock Award: 'सुवर्ण मयूर' कोण पटकावणार? इफ्फीच्या समारोपाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष

SCROLL FOR NEXT