Amul Milk Dainik Gomantak
गोवा

Milk Prize : अमूल दूध प्रतीलिटर दोन रूपयांनी महागले

Milk Prize : तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Milk Prize :

पणजी, लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच देशभरातील सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या किंमतीत प्रती लिटर मागे २ रूपये दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. वर्षानंतर पुन्हा दरात वाढ करण्यात आली आहे. दरवाढीसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने म्हटले आहे की, दूध उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत.

तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

अमूल डेअरीच्या धोरणानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी मोजलेल्या एक रुपयापैकी जवळपास ८० पैसे दूध उत्पादकांना जातात.

दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT