Goa General Election: ज्यावेळी पणजी आणि मुरगाव मतदारसंघ होते, गोष्ट गोव्याच्या पहिल्या आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीची

Goa General Election History: गोवा मुक्तीनंतर 1963 रोजी झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते.
Goa General Election History
Goa General Election HistoryOnline Resources

Goa General Election History

देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवसावर येऊन ठेपला आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येईल असा विश्वास एनडीए आघाडीला आहे तर यावेळी सत्तांतर होईल असे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

गोव्यात दोन जागांसाठी यावेळी काँटे की टक्कर होताना दिसत असून, भाजप आणि काँग्रेसला त्यांचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास वाटत आहे. दरम्यान, गोवा मुक्तीनंतर 1963 रोजी झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी गोवा आणि दमण दीवसाठी संयुक्तपणे पणजी व मुरगाव असे मतदारसंघ होते.

गोवा मुक्तीनंतर राज्यात डिसेंबर 1963 रोजी पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यावेळी राज्यात पणजी आणि मुरगाव असे दोन लोकसभेचे मतदारसंघ होते आणि दोन्ही जागेवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खासदार निवडून आले.

पणजी मतदारसंघ

पीटर अल्वारीस (प्राजा सोशालिस्ट पक्ष, मगोचा पाठिंबा) यांच्या विरोधात युनाटेड गोवन्स पक्षाचे सुरळकर निवडणूक लढवत होते. यात अल्वारीस यांनी 67,275 एवढी मते मिळवत सुरळकर (36,550) यांचा पराभव केला. अल्वारीस यांच्या मताची टक्केवारी 52.80 टक्के एवढी होती.

मुरगाव मतदारसंघ

तर मुरगाव मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून निवडणूक लढत मुकुंद शिंक्रे विजयी झाले होते.

1967 सालची लोकसभा निवडणूक

पणजी मतदारसंघ

विजयी उमेदवार जनार्दन शिंक्रे (काँग्रेस 56,764 मते)

त्यांच्याविरोधात युनायडेट गोवन पक्षाचे के. बी. मंगेश यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना 45,810 मते मिळाली.

मुरगाव मतदारसंघ

मुरगावमध्ये युनायडेट गोवन पक्षाच्या एराज्यो सिक्वेरा यांनी निवडणूक लढवली त्यांना 54,327 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या एस. एस कवळेकर यांना (51,775) मते मिळाली.

1971

पणजी मतदारसंघ - पुरूषोत्तम काकोडकर (काँग्रेस)

मुरगाव मतदारसंघ - एराज्यो सिक्वेरा (युनाडेट गोवन्स)

1977

पणजी - अमृत कांसार (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष)

मुरगाव - एदुआर्द फालेरो (काँग्रेस)

Goa General Election History
Goa Loksabha Result 2024: एक्झिट पोलनंतर विरोधकांची मदार ‘सायलेंट’ मतदारांवर; निकाल उद्या

गोव्यात 1980 ते 2019 या काळात झालेले खासदार

पणजी (उत्तर गोवा)

संयोगिता राणे (मगो 1980)

शांताराम नाईक (काँग्रेस 1984)

गोपाळराव मयेकर (मगो 1989)

हरिश झांट्ये (काँग्रेस 1991)

अ‍ॅड. रमाकांत खलप (मगो 1996)

रवी नाईक (काँग्रेस 1998)

श्रीपाद नाईक (भाजप 1999, 2004, 2009, 2014, 2019)

मुरगाव (दक्षिण गोवा)

एदुआर्द फालेरो (काँग्रेस 1980, 1984, 1989, 1991)

चर्चिल आलेमाव (युगोडेपा 1996) आणि काँग्रेस (2004)

फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस, 1998, 2007, 2009 आणि 2019)

रमाकांत आंगले (भाजप 1999)

अ‍ॅड. नरेंद्र सावईकर (भाजप 2014)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com