Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Online WhatsApp Chatbot: सरकारी सेवा नागरिकांना अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी गोवा सरकारने गोवा ऑनलाईन सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हॉट्स-ॲप चॅटबॉट सुरू केला आहे.
Goa Online WhatsApp Chatbot
Online ServicesDainik gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी सेवा नागरिकांना अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी गोवा सरकारने गोवा ऑनलाईन सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हॉट्स-ॲप चॅटबॉट सुरू केला आहे.

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व दळणवळण विभागाने गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्र संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवर जाण्याऐवजी व्हॉट्स-ॲपच्या माध्यमातून गोवा ऑनलाईनच्या विविध सेवांचा लाभ घेता येईल.

Goa Online WhatsApp Chatbot
Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

दोनापावला येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, खात्याचे संचालक कबीर शिरगावकर, ‘गेल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती कुमार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

गोवा ऑनलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत २१ लाखांहून अधिक विनंत्या प्राप्त झाल्या असून, नऊ लाखांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. नागरिकांना सरकारी सेवांची माहिती व मार्गदर्शन २४ तास उपलब्ध व्हावे, यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे.

९४०४८५८१०५ या नंबरवर मिळतील सेवा

गोवा ऑनलाईनच्या विविध सेवांसाठी अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शन, सादर केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती तपासता येणार, जारी झालेली प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पाहता व डाऊनलोड करता येतील, पूर्ण झालेल्या व्यवहारांच्या देयक पावत्या पाहता व डाऊनलोड करता येणार, चॅट किंवा मेनूमधील पर्याय निवडून सेवांचा वापर करता येणार, सरकारी सेवांची माहिती व मार्गदर्शन २४ तास उपलब्ध.

Goa Online WhatsApp Chatbot
Goa Land Dispute: 'शत्रू मालमत्ता' म्हणून जमीन जप्त करण्याचा आदेश रद्द; विक्रेती पाकिस्तानी असल्याचा पुरावाच नाही, गोवा खंडपीठाचा मोठा निर्णय

सेवा वापरण्यासाठी काय कराल?

मोबाईलमध्ये ९४०४८५८१०५ हा क्रमांक जतन करा.

या क्रमांकावर व्हॉट्स-ॲपद्वारे ‘Hi’ असा संदेश पाठवा.

चॅट किंवा मेनूमधील उपलब्ध पर्याय निवडा.

आवश्यक सरकारी सेवा निवडा.

अर्ज, प्रमाणपत्रे, कागदपत्रे, पावत्या किंवा अर्जाची स्थिती तपासा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com