Milind Naik Dainik gomantak
गोवा

'निवडणुकीचे तिकीट देण्यासाठीच मिलींद नाईकांची केस बंद'

काँग्रेस जाणार उच्च न्यायालयात

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी दाखल केलेली केस बंद केल्याने काँग्रेसने त्या कृतीचा निषेध केला आहे आणि या लैंगीक अत्याचार केसीचा विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहे.

काँग्रेसचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्यासह महिला अध्यक्षा बीना नाईक यांनी बुधवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन मिलिंद नाईक (Milind Naik) यांना सेक्स स्कँडल प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजपने सरकारी यंत्रणा वापरल्याचे सांगितले.

काँग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी महिला पोलीस ठाण्यात दाखल केलेली पोलीस तक्रार बंद करणे म्हणजे भाजपने (BJP) तिकीट जाहीर करण्याच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने रचलेले नाटक आहे. मिलिंद नाईक यांना तिकीट देण्याची सोय भाजपने केली आहे असे पणजीकर म्हणाले. मिलिंद नाईक यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने हे सर्व नाटक गृहमंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार रचले जात असल्याचे ते म्हणाले.

"मिलिंद नाईक यांचे सेक्स स्कँडल उघड करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांचा छळ केला जात आहे." असे पणजीकर म्हणाले. ते म्हणाले की पीडितेने आरोप फेटाळून लावल्याच्या आधारे महिला पोलिस स्थानकाने तक्रार बंद केली आहे आणि पोलिस उप अधिक्षकांनी सखोल चौकशी केली आहे हे अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पोलिस (Police) उप अधिक्षकांनी ही चौकशी कशी काय केली कारण तक्रारदाराला देखील चौकशीसाठी बोलावले गेले नाही." असे ते म्हणाले.

पणजीकर म्हणाले की, पीडित महिलेवर मिलिंद नाईक आणि भाजप सरकारने हे प्रकरण बंद करण्यासाठी दबाव आणला आहे. हे प्रकरण बंद करण्यासाठी पीडितेला लाखो रुपये देण्यात आले आहेत. आम्ही तिच्या बँक खात्याचा तपशील दिला होता, मात्र या प्रकरणात कोणतीही चौकशी झाली नाही. बीना नाईक म्हणाल्या की, गोव्यात महिलांना सुरक्षितता नाही. "आमचा आता या सरकारवर विश्वास नाही." असे ती म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Job Scam: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून 'इतक्या' लाखांचा गंडा; वार्का येथील रहिवाशाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

31 डिसेंबरपूर्वी उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं; अन्यथा नवीन वर्षात बसू शकतो आर्थिक फटका

क्रिकेट विश्वावर शोककळा! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी घडवला इतिहास; वाघशीर पाणबुडीतून केली सागरी सफर, पाहा Photo, Video

SCROLL FOR NEXT