Goa BJP: Milind Naik
Goa BJP: Milind Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: राजीनामा द्यायचे नाटक करत मिलिंद नाईकांना मिळाली भाजपची उमेदवारी

दैनिक गोमन्तक

गोवा: भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते, अखेर भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपला काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याची सर्वांना पूर्ण कल्पना आली आहे. उमेदवारी यादी निश्चित करण्यासाठी दिल्लीत पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (j.P Nadda) यांच्या उपस्थितीत दिवसभर चर्चा झाली. दरम्यान आज 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप 40 मतदारसंघातून जागा लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Milind Naik gets goa BJP candidature)

वासनाकांडात अडकलेले माजी वीजमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik Case) यांना सेक्स स्कँडल प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजपने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी महिला पोलीस (Goa Police) ठाण्यात दाखल केलेली तक्रार बंद करणे म्हणजे तिकीट जाहीर करण्याच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने रचलेले हे कटकारस्थान आहे; असा आरोप भाजपवर सातत्याने होत असतानाच भाजपने मिलिंद नाईक यांना मुरगाव येथून उमेदवारी जाहीर केली आहे.

काय आहे सेक्स स्कँडल प्रकरण?

सेक्स स्कँडलमध्ये मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी उघड केले होते. दिलेल्या मुदतीत सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने हे नाव उघड केल्याचे चोडणकरांनी सांगीतले होते. दरम्यान काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांनी काही ध्वनिफिती, चित्रफिती व व्‍हॉट्‌सॲप संदेशांच्या पुराव्यांसह मंत्री नाईक यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती.

तसेच, प्रकरणातील पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी बिहारमध्‍ये संकल्प आमोणकर यांच्यासह पाच जणांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती.

बेकायदा नोकरभरतीचा आरोप

माजी वीजमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी त्‍यांच्या 2012-2017 या कार्यकाळात अनेक बेकायदा गोष्टी त्‍यांच्‍या विभागाकडून घडल्‍याचे तसेच बेकायदा नोकरभरती केल्‍याचे माहितीहक्काद्वारे उघड झाले होते. नाईक हेच त्‍यासाठी जबाबदार आहेत, असा आरोप ‘गोवा फर्स्ट’चे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी केला होता.

दरम्यान पत्रकार परिषदेत सोनुर्लेकर म्‍हणाले होते की, मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी वीजमंत्री असताना आपल्‍या खात्‍यात बेकायदा नोकरभरती केली आहे. त्‍यातील बहुतांश उमेदवार हे त्‍यांच्‍या मतदारसंघातील आहेत. यात त्यांची चुलत बहीण आणि त्यांच्या एका नातेवाईकाचाही समावेश आहे.

मंत्रिपदाचा दिला राजीनामा

सेक्स स्कॅण्डलमध्ये गुंतल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्यानंतर तसेच संकल्प आमोणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा रात्री उशिरा राजीनामा दिला होता.

म्हणून तक्रार तक्रार निकालात काढली

भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणी एफआयआर का दाखल केला गेला नाही? असा प्रश्न महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. पणजीतील महिला पोलिस स्थानकावर जाऊन यासंदर्भात काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी प्रश्न केले होते. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, यानंतर पोलिसांनी (police) तपास यंत्रणेवर जोरदेत तपास सुरू केला होता. आता संबंधित महिलेने संकल्पने केलेले सर्व दावे नाकारणारा अर्ज दिल्यानंतर महिला पोलिसांनी तक्रार निकालात काढली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT