Goa Politics Milind Naik

 

Dainik Gomantak

गोवा

मिलिंद नाईक पुन्‍हा सापडले कचाट्यात

बेकायदा नोकरभरतीचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को: वासनाकांडात अडकलेले माजी वीजमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) आता आणखी एका नव्‍या वादात सापडले आहेत. त्‍यांच्या 2012-2017 या कार्यकाळात अनेक बेकायदा गोष्टी त्‍यांच्‍या विभागाकडून घडल्‍याचे तसेच बेकायदा नोकरभरती केल्‍याचे माहितीहक्काद्वारे उघड झाले आहे. नाईक हेच त्‍यासाठी जबाबदार आहेत, असा आरोप ‘गोवा फर्स्ट’चे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत सोनुर्लेकर म्‍हणाले की, मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी वीजमंत्री असताना आपल्‍या खात्‍यात बेकायदा नोकरभरती केली आहे. त्‍यातील बहुतांश उमेदवार हे त्‍यांच्‍या मतदारसंघातील आहेत. यात त्यांची चुलत बहीण आणि त्यांच्या एका नातेवाईकाचाही समावेश आहे.

मुरगावच्‍या एका माजी नगराध्यक्षाच्‍या पत्नीची वयोमर्यादा उलटून गेल्‍यावरही तिला नोकरी देण्‍यात आली. तसेच बहुतांश उमेदवारांनी नोकरी मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले. महसूल विभागही स्कॅनरखाली आहे. कारण अनेक परप्रांतीयांना सरकारी

नोकरी (Goa Job) देण्‍यात आल्‍याचे माहितीहक्काद्वारे उघड झाले आहे. या सर्व प्रकारांत मुरगावच्‍या तत्कालीन मामलेदारांचाही हात आहे. कारण 15 वर्षांचा रहिवासी दाखला नसतानाही अनेकांना सरकारी खात्‍यांत खोगीरभरती करण्‍यात आली, असे सोनुर्लेकर म्‍हणाले.

अन्‍यथा न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावणार

या सर्व प्रकारांची चौकशी करून बनावट प्रमाणपत्रासह वीज खात्‍यात नोकरीला लागलेल्‍या उमेदवारांना तात्‍काळ कामावरून काढून टाकून तेथे पात्र गोमंतकीयांना संधी द्यावी, अशी मागणी विद्यमान वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे सोनुर्लेकर यांनी केली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने 30 हून अधिक अशा बेकायदा नोकरीत भरती झालेल्या लोकांना नोकरीतून कमी करण्याचा आदेश दिला होता याची आठवण करून देतानाच वीज खात्‍यांतील अशा लोकांना कामावरून काढले नाही तर आम्‍ही पुन्‍हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशाराही सोनुर्लेकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT