Goa Fishing Boat Missing Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

Fishing Boat Missing: काणकोण तालुक्यातील तळपण येथून मासेमारीसाठी गेलेली एक बोट अरबी समुद्रात बेपत्ता झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीवर एकूण चार मच्छिमार स्वार होते.

Manish Jadhav

काणकोण: गोव्याच्या किनारपट्टीवरुन एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. काणकोण तालुक्यातील तळपण येथून मासेमारीसाठी गेलेली एक बोट अरबी समुद्रात बेपत्ता झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटेवर एकूण चार मच्छिमार होते. सोमवारी (15 डिसेंबर) ही बोट समुद्रात रवाना झाली होती, मात्र बराच वेळ उलटूनही ती परतली नाही किंवा त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

सोमवारी सकाळी काणकोणच्या (Canacona) तळपण किनाऱ्यावरुन ही मासेमारी बोट नेहमीप्रमाणे खोल समुद्रात रवाना झाली होती. संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ही बोट परत येणे अपेक्षित होते. मात्र, रात्र उलटली तरी बोटीचा पत्ता लागला नाही. बोटीवरील मच्छिमारांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक मच्छिमार बांधवांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. त्यानंतर ही बोट बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आणि तात्काळ प्रशासनाला याची कल्पना देण्यात आली.

प्रशासनाकडून मोठी शोधमोहीम

मच्छिमार बेपत्ता झाल्याची बातमी समजताच तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. समुद्रात हवामानाची स्थिती आणि बोटीचे संभाव्य लोकेशन लक्षात घेऊन शोधमोहीम राबवली जात आहे. समुद्राच्या खोल भागात या बोटीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टर तैनात केले आहे. आकाशातून समुद्राच्या विस्तीर्ण भागावर नजर ठेवली जात असून बेपत्ता बोटीच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हेलिकॉप्टरसोबतच तटरक्षक दलाच्या वेगवान बोटीही समुद्रात गस्त घालत आहेत. स्थानिक मच्छिमार बांधव देखील आपल्या परीने या शोधमोहिमेत मदत करत आहेत. समुद्रातील लाटा आणि वाऱ्याचा वेग लक्षात घेता बोट नेमकी कोणत्या दिशेला वाहून गेली असावी, याचा अंदाज घेतला जात आहे.

कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण

बेपत्ता झालेल्या चारही मच्छिमारांच्या कुटुंबात सध्या चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य सुखरुप परत येतील, या आशेने तळपण किनाऱ्यावर मच्छिमारांनी गर्दी केली आहे. खोल समुद्रात (Sea) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोट भरकटली आहे की खराब हवामानामुळे काही अडचण निर्माण झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काणकोणच्या किनारपट्टीवर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनेकदा मच्छिमारांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. आताही सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, या 4 मच्छिमारांचा शोध लवकरच लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT