Mid Day Meal Goa Dainik Gomantak
गोवा

Mid Day Meal: मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून मिड-डे-मीलची चाचणी आवश्यक!!

Government Food Safety Regulations: मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून सर्व अन्न नमुन्यांची चाचणी करत संबंधित अहवाल सादर करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: गोव्यात जवळपास 1.61 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारांमध्ये असलेल्या पौष्टिक तत्वांची चाचणी करण्यासाठी केंद्र सरकारने गोवा राज्य सरकारला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून सर्व अन्न नमुन्यांची चाचणी करत संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्थिक वर्ष 2024-25 साठी घेतलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) बैठकीदरम्यान, गोव्याला राज्यातील सर्व शाळांमध्ये गरमगरम माध्यान्ह आहार मिळवा तसेच दरम्यान स्वच्छतेचे पालन करण्यात यावे असा आदेश देण्यात आलाय.

शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माध्यान्ह आहाराची रुची वाढावी म्हणून विविध प्रकारचे मेनू उपलब्ध करून देण्याचा तसेच राज्यातील NGO's सोबत असलेली भागेदारी कायम ठेवण्याचा सल्ला राज्याला दिलाय.

गोव्यात माध्यान्ह आहाराला चांगला प्रतिसाद

राज्यातील शालेय भोजनाचा हा उपक्रम चांगले परिणाम दाखवत आहे. सध्या राज्यात 1,231 शाळांपैकी 1,216 शाळांना महिला बचत गटांद्वारे व्यवस्थापित स्वयंपाकघरातून गरम शिजवलेले जेवण दिले जाते. उर्वरित 15 शाळांना पालक शिक्षक संघटनांकडून (PTAs) जेवण दिले जाते. हा उपक्रम उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील एकूण 158,000 विद्यार्थ्यांना शालेय जेवण पुरवतो.

राज्यात तिथी भोजनाच्या उपक्रमाअंतर्गत स्थानिक शाळकरी मुलांनी पोषक अन्न किंवा फळं वैगरे देतात. वर्ष 2023-24 मध्ये या उपक्रमाअंतर्गत 664 शाळांमध्ये शालेय जेवण पुरवण्यात आले आहे. तिथी भोजनाअंतर्गत राज्यातील स्थानिक वाढदिवस, किंवा इतर समारंभानिमित्त मुलांना खाऊ देऊ शकतात.

राज्यात सुरु असलेला आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना चिक्की आणि लाडू यांसारख्या बाजरी-आधारित स्नॅक्सचे वाटप यामधून निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT