Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

Mickky Pacheco: तिकीट नाकारलं, नाराज मिकी पाशेकोंचा काँग्रेसला रामराम

पाशेको यांनी आपला राजीनामा गिरीश चोडणकर यांच्याकडे सुपूर्द केला

दैनिक गोमन्तक

Mickky Pacheco: गोवा विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाही गोव्यात पक्षांतराचे प्रमाण काही घटले नाही. दरम्यान सर्वच पक्षांतर्फे आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. उमेदवारी न मिळाल्यानेही अनेक राजकीय नेते आपल्या पक्षाला रामराम करत आहे. यातच कॉंग्रेस नेते मिकी पाशेको (Mickky Pacheco) यांना कॉंग्रेसने (Congres) उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.

कॉंग्रेसने दोन याद्या जाहीर केल्यावर पाशेको यांना आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याची शंका आली होती. त्यावेळीच त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, 'आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकणार नाही. शिवाय उमेदवारी दिली नाही म्हणून मी मागे हटणाऱ्यापैकी नाही. काँग्रेसने (Congress) उमेदवारी नाकारल्यास माझ्यापुढे अनेक पर्याय आहेत. योग्य वेळी मी माझी भूमिका उघड करणार आहे, असे मिकी पाशेको यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

बाणावलीची उमेदवारी तियांत्रिस्त टोनी डायस याना जाहीर केल्यानंतर आज पाशेको यांनी आपला राजीनामा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर याना पाठवून दिला. आपण काँग्रेस पक्षाला गोव्यात पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी या पक्षात सामील झालो होतो. पण काँग्रेसला भ्रष्ट्राचाराचा गंज चढला असून त्यातून हा पक्ष बाहेर पडण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही त्यामुळे आपण नाइलाजाने पक्षातून बाहेर पडत असल्याचे पाशेको यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.

पाशेको यांनी स्वतः काँग्रेसच्या बाणावलीच्या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र काँग्रेसने फॉर्मेलीन एजंटच्या माध्यमातून ही उमेदवारी विकली असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसचे उमेदवार स्थानिक गट ठरविणार असे पी. चिदंबरम यांनी सांगितले होते याची आठवण करून देताना तसे जर असेल तर तृणमूलमधून आयात करून आणलेल्या उमेदवाराला 48 तासात ही उमेदवारी कशी दिली असा त्यांनी सवाल केला आहे. चिदंबरम बोलतात छान पण त्यांच्या बोलण्यातही दम नाही हे आता सिद्ध झाले आहे अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान पाशेको यांनी काँग्रेस सोडून पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून कदाचित आता ते नुवेतून निवडणूक लढविणार असे सांगितले जाते.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा याना याबाबत विचारले असता, पाशेको यांची आमच्या बरोबर बोलणी चालू असून एकतर ते आमचे बाणावली किंवा नुवेचे उमेदवार असू शकतात असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT