Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

Mickky Pacheco : मिकी पाशेको पुन्हा भाजपच्या संपर्कात?

बेतालभाटीत फुटबॉल सामन्याला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Mickky Pacheco : सासष्टीत ‘कमळा’ला चांगले दिवस येणार असल्याचा जो संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच दिला होता, त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. रविवारी बेतालभाटी येथील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे व नावेलीतील भाजप आमदार उल्हास तुयेकर यांच्यासमवेत लावलेली उपस्थिती, हे त्याचेच निदर्शक मानले जाते.

मिकी पाशेको यांनी हल्लीच राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने ते भाजपशी जवळीक करणार असा कयास अनेकांनी केला होता. अन् झालेही तसेच. स्वतः मिकी यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण भाजपच्या संपर्कात असल्याचे मान्य तर केलेच, पण त्याच बरोबर पत्नी व्हियोलाचा परिचय मुख्यमंत्री, तानावडेना करून दिला असता त्यांनी त्यांना विकासकामासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

दरम्यान ही स्पर्धा माजीमंत्री व आमदार मिकी पाशेको यांनी आयोजित केली होती. तेथे ते स्वतः व त्यांच्या पत्नी तथा बेतालभाटीच्या उपसरपंच व्हियोला उपस्थित होत्या. त्यामुळे गोव्यातील नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी असल्याचे अनेकांना वाटले. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री सासष्टीच्या ख्रिश्चन नेत्यांना जवळ पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT