Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास अनेक पर्याय खुले : मिकी पाशेको

आजपासून पाशेकोंची प्रचाराला सुरुवात, थेट पक्षनेतृत्त्वाला आव्हान

दैनिक गोमन्तक

सासष्टी : काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र त्यात बाणावली मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार व  माजी आमदार मिकी पाशेको गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याचं चित्र आहे. अशातच उमेदवारी नाकारल्यास आपल्यासाठी अनेक पर्याय खुले असल्याचं सांगत मिकी पाशेकोंनी थेट काँग्रेसला आव्हान दिलं आहे. (Mickky Pacheco News Updates)

आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकणार नाही. शिवाय उमेदवारी दिली नाही म्हणून मी मागे हटणाऱ्यापैकी नाही. काँग्रेसने (Congress) उमेदवारी नाकारल्यास माझ्यापुढे अनेक पर्याय आहेत. योग्य वेळी मी माझी भूमिका उघड करणार आहे, असे मिकी पाशेको यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

बाणावलीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणुन आपण 12 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात करणार आहे. बाणावलीत माझी वैयक्तिक पाच हजार पेक्षा जास्त मते आहेत. शिवाय सध्याचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांना आव्हान देण्याची ताकद केवळ आपल्यामध्ये आहे, हे कॉंग्रेस नेत्यांना माहीत आहे असेही मिकी पाशेको याने सांगितले. माझा प्रचार वाड्या-वाड्यामध्ये होणार आहे व निवडणूक आचारसंहितेचे पालन केले जाईल, असेही पाशेको म्हणाले.

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोयत्रा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) काँग्रेस व तृणमूलमध्ये युती होणार असे वक्तव्य केले आहे ते साफ दिशाभूल करणारे आहे, असे पाशेको म्हणाले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युतीसाठी बोलणी चालू असली तरी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बाणावलीत आपणच योग्य उमेदवार असल्याचे पाशेको म्हणाले.

बाणावलीत आपण सर्व्हे केला असून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मिकी पाशेकोला जास्त पाठिंबा लाभत आहे. शिवाय 20 वर्षांनंतर बाणावलीत काँग्रेसला जिंकण्याची ही चांगली संधी आहे. या मतदार संघातील परिस्थिती आपण पक्ष श्रेष्ठीच्या कानावार घातली असल्याचे बाणावली काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष मेनिनो फर्नांडिस यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT