Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Aleixo Sequeira vs Mickky Pacheco: या याचिकेत मंत्री सिक्‍वेरा यांच्‍याबरोबर राज्‍य सरकार, विधानसभेचे सभापती व गोव्‍यातील पासपोर्ट अधिकारी यांना प्रतिवादी करण्‍यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Sequeira vs Mickky Pacheco: पर्यावरण मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांची जन्‍मनोंदणी पोर्तुगालमध्ये झाली असून त्‍यामुळे ते विदेशी नागरिक आहेत, असा दावा करून विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री होऊ शकत नाही, असा दावा करून माजी मंत्री मिकी पाशेको यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

सिक्‍वेरा यांना मंत्रिपदावरून खाली उतरवावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. काल सोमवारी पाशेको यांनी ही याचिका दाखल केली. मात्र ही याचिका सर्वसाधारण पद्धतीनेच सुनावणीस येऊ शकते, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट करताना, याचिकाकर्त्याला हवे असल्‍यास त्‍यांनी प्रतिवाद्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करावी, अशी सूचना केली.

दरम्यान, या याचिकेत मंत्री सिक्‍वेरा यांच्‍याबरोबर राज्‍य सरकार, विधानसभेचे सभापती व गोव्‍यातील पासपोर्ट अधिकारी यांना प्रतिवादी करण्‍यात आले आहे. या प्रकरणात पाशेको यांच्‍यावतीने ॲड. हृदयनाथ शिरोडकर हे सोमवारी न्‍यायालयात हजर होते. ही याचिका उन्‍हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या कामकाजावेळी सुनावणीस येऊ शकते, असे समजते. सिक्‍वेरा यांची मंत्रिपदावर नियुक्‍ती केल्‍यानंतर पाशेको यांनी, सिक्‍वेरा हे भारतीय नागरिक नाहीत त्‍यामुळे त्‍यांची मंत्रिपदावर नियुक्‍ती करणे बेकायदेशीर असल्‍याचा दावा केला होता, मात्र सिक्‍वेरा यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.

इंडिया आघाडीला समर्थन

दहा वर्षात केंद्रात भाजप सरकारने फक्‍त भ्रष्‍टाचारच केला. या सरकारला सामान्‍य लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. यामुळे भाजप सरकार सत्ताभ्रष्‍ट होणे ही काळाची गरज आहे. यासाठीच मी इंडिया आघाडीच्‍या उमेदवाराला माझा पाठिंबा दिला आहे असे नुवेचे माजी आमदार आणि माजी मंत्री मिकी पाशेको यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT