Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

Politics Of Goa...म्हणून चर्चिल भाजपचे गोडवे गाताहेत; माजी आमदार मिकी पाशेको यांची टिका

चर्चिव यांच्‍या फुटबॉल क्‍लबला सरकारची मोठी आर्थिक मदत

गोमन्तक डिजिटल टीम

बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजपचे गोडवे गायले नाहीत तर त्‍यांच्‍या मिळकतीवर नक्‍कीच परिणाम होणार त्यामुळे आलेमाव यांनी भाजपला पाठिंबा देणे आवश्‍‍यक असल्‍याची टीका नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी केली.

चर्चिल आलेमाव यांनी 2024 मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्‍याचे विधान केल्‍यानंतर मिकी यांनी आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

चर्चिव आलेमाव यांच्‍या फुटबॉल क्‍लबला सरकारने मोठी आर्थिक मदत केली आहे. हे पैसे आलेमाव खेळाडूंना देतात की नाही हे आपल्‍याला ठाऊक नाही. परंतु भाजप सरकारकडून त्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत प्राप्‍त झाली आहे.

त्‍याच बरोबर भाजप सरकारला पाठिंबा देत असल्‍याने चर्चिलयांची अनेक कामे होत आहेत. त्‍यात कर्मचार्‍यांच्‍या बदल्‍या करणे, आपल्‍याला पाहिजे असलेले अधिकारी आणणे यामुळे आलेमाव यांनी भाजपाला पाठिंबा दिलाच पाहिजे असे मिकी पाशेको म्‍हणाले.

नुवे मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नंतर भाजपचे आमदार होतात. हे दोन वेळा झाले आहे. यापूर्वी विल्‍फ्रेड डिसा हे भाजपचे आमदार होते. आता आलेक्‍स सिक्‍वेरा हे भाजपचे आमदार आहेत. अन्‍य राजकीय पक्षांकडून ऑफर आली तर आपण दक्षिण गोव्‍यातून निवडणूक लढविण्‍यास तयार असल्‍याचे पाशेको यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT