Goa Forward Party : ध्वनी परवानगी मिळविण्यासाठी सरकारने लोकांना वेठीस धरण्याचे बंद करावे

प्रक्रिया सुलभ करण्याची गोवा फॉरवर्डची सरकारकडे मागणी
Press Conference by Goa Forward General Secretary Mohandas Lolienkar
Press Conference by Goa Forward General Secretary Mohandas LolienkarDainik Gomantak
Published on
Updated on

काजार, विवाह समारंभासाठी ध्वनी परवाना मिळविण्यासाठी लोकांना साळगाव येथे जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागते. ही प्रक्रिया जाचक आहे. सरकारचा जनतेला वेठीस धरण्यासारखा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सरकारने त्वरित शिथिल करावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केली.

आज मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले, गोव्यातील सद्याचे सरकार सामान्य लोकांचे हीत जपणारे नसुन मंत्री किंवा खात्याचे सचिव नागरीकांना जास्तित जास्त त्रास कसा होईल याकडेच जास्त लक्ष देतात अशी टिका लोलयेकर यानी केली.

Press Conference by Goa Forward General Secretary Mohandas Lolienkar
Temperature Falling in Goa: दिलासा! गोव्यात कमाल तापमानात झाली एक अंश सेल्सियसने घट

कार्यक्रमांसाठी रात्रीच्या वेळी ध्वनी परवानगी प्रक्रिया शिथील करावी किंवा ही प्रक्रियाच मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान हा परवाना मिळविण्याची किचकट पद्धत सांगताना ते म्हणाले, ध्वनी परवानगीसाठी सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी कचेरीत अर्ज द्यावा लागतो.

नंतर तो अर्ज घेऊन पोलिस उप अधिक्षकाच्या कचेरीत जावे लागते व परत उपजिल्हाधिकारी कचेरीत यावे लागते. यात भर म्हणुन आता सरकारने अर्जा बरोबर प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडुन ध्वनी परवानगी आवश्यक असल्याचे राजपत्राद्वारे कळविले आहे.

Press Conference by Goa Forward General Secretary Mohandas Lolienkar
Xeldem Sarpanch : शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी कविता गावस देसाई यांची बिनविरोध निवड

त्यासाठी अर्जदाराला आणखी 3 हजार रुपये भरावे लागतात. ही रक्कम साळगाव येथे जाऊन भरावी लागते. याप्रक्रियेसाठी काणकोण, सांगे किंवा गोव्यातील इतर ग्रामीण भागातील लोकांना प्रवास खर्च सोसावा लागतो व वेळही वाया जातो. त्यामुळे ही पद्धत सोपी करावी आणि लोकांना या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी करताना यासाठी संबंधित खात्याला लवकरच पक्षातर्फे पत्र पाठविले जाईल असे सांगितले.

चर्चिल आलेमाव यांनी सरदेसाई यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना लोलयेकर म्हणाले, "चर्चिल भाजपच्या पे रोलवर आहेत. त्यामुळेच त्यांना भाजपची भलावण करावी लागते. आमचे नेते विजय सरदेसाई हे चर्चिल प्रमाणे सरकारचे मिंधे नाहीत. त्यामुळे चर्चिल यांनी त्यांच्यावर टीका करू नये. चर्चिल हे आता प्रभावहीन नेते असल्याने त्यांच्या टीकेला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत असे त्यांनी शेवटी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com