Former Minister Mickey Pashko Dainik Gomantak
गोवा

समुद्र किनाऱ्यावर गाडी चालविल्याच्या आरोपातून मिकी पाशेको निर्दोष मुक्त

मडगाव (Margao) प्रथम वर्ग न्यायालयाने आज त्यांना आरोप दाखल करून घेण्यापूर्वीच निर्दोष मुक्त केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: वादग्रस्त माजी मंत्री मिकी पाशेको (Former Minister Mickey Pashko) यांच्यावर मार्च 2018 मध्ये बेताळभाटी किनाऱ्यावर आपली गाडी चालवून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा गुन्ह्याखाली जो खटला दाखल केला होता. त्यात पोलिसांना पुरेसे पुरावे सादर न करता आल्याने मडगाव (Margao) प्रथम वर्ग न्यायालयाने आज त्यांना आरोप दाखल करून घेण्यापूर्वीच निर्दोष मुक्त केले. मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्लो दा सिल्वा (Carlo da Silva) यांनी आज हा निकाल दिला. हा कथित प्रकार मार्च 2018 मध्ये घडला होता. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी पाशेको यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पाशेको यांच्यावतीने न्यायालयात ऍड. कार्लोस आल्वारीस (Carlos Alvarez) व ऍड. बायरन रोड्रिक्स यांनी बाजू मांडली.

पाशेको यांच्याविरूद्ध जलक्रीडा चालक मिलरॉय दासिल्वा (Milroy Dasilva) यांनी ही तक्रार दिली होती. पाशेको आपल्या गाडीने समुद्र किनाऱ्यावर भरधाव वेगाने येऊन त्यांनी आपल्या सामग्रीची नासाधुस केली व आपल्याला शिवीगाळ करून जिवंत मारण्याची धमकीही दिली असा आरोप केला होता. मात्र या आरोपात तथ्य नसून फक्त राजकीय वैमनस्यातून आपल्या आशिलावर ही तक्रार केली गेली असा युक्तिवाद ऍड. आल्वारीस यांनी केला.

माजी पर्यटनमंत्री असलेले पाशेको हे अत्यंत वादग्रस्त राजकारणी असून मंत्री असताना एका वीज अभियंत्याला मारहाण केल्या प्रकरणी त्यांना सहा महिन्यांची कैदेची शिक्षा थोटावण्यात आली होती. त्यांची मैत्रीण नादिया तोरातो हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे त्याना त्यामुळे आपले मंत्रिपद गमवावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT