MLA Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: मायकल लोबो यांनी केले वाहतूक पोलिसांना लक्ष्य; तालांवच्या रूपाने पर्यटकांची सतावणूक

गृह खात्याने महसूल गोळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी रक्कम गोळा करण्याचे लक्ष्य (टार्गेट) देऊ नये: लोबो

दैनिक गोमन्तक

गृह खात्याने महसूल गोळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी रक्कम गोळा करण्याचे लक्ष्य (टार्गेट) देऊ नये. वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांवर केल्या जाणाऱ्या दंडात्मक कारवाईने महसूल वाढणार नाही, अशा शब्दांत सत्ताधारी पक्षाचे आमदार मायकल लोबो यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला. लोबो यांच्या विधानाला दुजोरा देत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही, अशा दंडात्मक कारवायांमुळे राज्याची प्रतिमा डागाळत असल्याचे सभागृहात सांगितले.

विधानसभेतील लक्षवेधीवरील चर्चेवेळी लोबो यांनी सांगितले की, गृह खात्याने महसूल वाढीसाठी वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आधार घेऊ नये. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिस अनेक ठिकाणी अडवतात, त्यांची सतावणूक करतात.

मग ते लोक आमच्याकडे येतात. पर्यटकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. इतर कोणत्याही देशात जा, वाट चुकलात तर तेथील पोलिस तुम्हाला योग्य मार्गाने जाण्यासाठी सूचना करतात, ते पर्यटकांवर कारवाई करीत नाहीत.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि वाहतूक पोलिसांना योग्य त्या सूचना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

‘एमएच’ टार्गेट

डॉ. शेट्ये म्हणाले की, ‘एमएच’ आणि ‘केआर’ नोंदणीकृत वाहनांवर बऱ्याचदा कारवाई होते. मला बेळगावच्या महापौरांचा फोन आला होता. कर्नाटकची नोंदणी असलेले वाहन पाहिल्यानंतर तुमचे पोलिस तपासणी नाक्यावर त्रास देतात, असेही ते विधानसभेत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT