MLA Michael Lobo on Coastal Area Waste Management
MLA Michael Lobo on Coastal Area Waste Management Dainik Gomantak
गोवा

किनारी पट्ट्यात कचऱ्याची समस्या वाढतीये; मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: मायकल लोबो

Kavya Powar

Coastal Area Waste Management: राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय आहे.

प्रामुख्याने किनारी पट्ट्यात कचऱ्याचा प्रश्न गहन बनला आहे. याबाबत माजी कचरामंत्री व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पूर्वीप्रमाणे कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित होत नसून विभागप्रमुख व कचरा मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्यात कचरा गोळा करणारे लोक बाहेरचे असतात. ते खरे तर कचरा व्यवस्थापनाचे आणि स्वच्छतेचे दूत आहेत. हे काम कोणी गोवेकर करेल का? काही राजकीय पक्ष आहेत जे त्यांना बाहेरील म्हणत हाकलून देऊ इच्छितात. काही लोक त्यांचा गैरवापर करतात. ते चांगले काम करतात. आपण त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे, असे परखड बोल लोबोंनी व्यक्त केले.

पुढे म्हणाले की, रस्त्याच्या कडेला आणि राज्यात जवळपास सर्वत्र कचरा टाकला जातो. पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कचरा दिसतो. लवकरात लवकर मंत्री आणि विभागप्रमुखांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT