Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo : मायकल लोबोंच्या हातातून कळंगुट निसटले

11 पैकी तीनच उमेदवारांची निवड : जोसेफ सिक्वेरा यांचे पुनरागमन

गोमन्तक डिजिटल टीम

Michael Lobo : विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना कळंगुट पंचायत निवडणुकीत जबर धक्का बसला. त्यांच्या पॅनेलमधील 11 पैकी केवळ तिघे उमेदवार निवडून आले, तर माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचा पाठिंबा लाभलेले उमेदवार तसेच इतर पाच अपक्ष जिंकून आले. या नवीन राजकीय समीकरणांमुळे आमदार लोबोंच्या हातातून कळंगुट पंचायत निसटली आहे. दरम्यान, बार्देश तालुक्यातून सदर कळंगुट पंचायत ही राजकीयदृष्ट्या सर्वांधिक लक्षवेधी निवडणूक ठरली.

लोबो यांनी ‘टुगेदर फॉर कळंगुट’ या पॅनेलअंतर्गत 11 सदस्य उभे केले होते. यात सात नवीन चेहरे होते. त्यापैकी केवळ पावलो माथाईस डिसोझा (प्रभाग 1), फ्रान्सिस्को रॉड्रिग्स (प्रभाग 7) व फिलोमिना फर्नांडिस (प्रभाग 11) मधून जिंकून आल्या. मात्र, निकाल जाहीर होताच, अर्ध्या तासातच फिलोमिना फर्नांडिस यांनी जोसेफ सिक्वेरा यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांच्या गटात त्या सामील झाल्या.

दुसरीकडे जोसेफ सिक्वेरा यांचे कळंगुट पंचायतीवर पुनरागमन झाले असून, ते प्रभाग 6 मधून निवडून आले. त्यांनी लोबो पॅनेलचे उमेदवार शॉन सिल्वेरा यांचा 176 मतांनी पराभव केला. तर सुनीता मयेकर (प्रभाग 3), गीता परब (प्रभाग 4), सावियो गोन्साल्विस (प्रभाग 5), स्वप्नेश वायंगणकर (प्रभाग 9), ऍनी फर्नांडिस (प्रभाग 10), फिलोमिना फर्नांडिस (प्रभाग 11) व स्वतः जोसेफ सिक्वेरा मिळून सात उमेदवार यांनी निकाल जाहीर होताच आपला स्वतंत्र गट असल्याचे सांगितले. आम्ही कळंगुट पंचायतीवर आमचे पॅनेल प्रस्थापित करणार, असा दावा केला. तर प्रसाद शिरोडकर (प्रभाग 2) मधून अपक्ष म्हणून निवडून आले.

मायकल लोबोंनी कळंगुट मतदारसंघातील एकूण चार पंचायतीपैकी कळंगुट पंचायतीवरच निवडणूकपूर्वी विशेष लक्ष व भर दिला होता. त्यांनी आपल्या पॅनेलच्या सर्व 11 ही सदस्यांचा घरोघरी जाऊन प्रचार देखील केला. मात्र, मतदारांनी निकाल हा लोबोंच्या विरोधात दिल्याचे दिसले. एकीकडे लोबो हे आपले आठ सदस्य जिंकून येतील, असा दावा करीत होते. मात्र, जोसेफ सिक्वेरा यांनी लोबोंना राजकीय धक्का देत कळंगुट पंचायतीवर आपले वर्चस्व स्थापित केले.

दरम्यान, तत्कालीन पंचायत निवडणुकीत आमदार मायकल लोबोंचे कळंगुट पंचायतीवर याच ‘टुगेदर फॉर कळंगुट’ या पॅनेलमधून आठ उमेदवार निवडून आले होते. मात्र, यावेळी तीनच उमेदवार जिंकल्याने लोबोंसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात असून, जोसेफ सिक्वेरा यांना प्रभाग आरक्षणाचा फायदा झाला, असे लोबो समर्थक दावा करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT