Congress Party Dainik Gomantak
गोवा

मायकल लोबो आणि के.सी. वेणुगोपाल यांची दिल्लीत भेट

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसमध्येही हालचाली

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपनंतर आता काँग्रेसनेही सत्ता राज्यात स्थापनेसाठीच्या हालचाली सुरू केल्यात. मायकल लोबो यांनी दिल्ली गाठत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. यावेळी 10 मार्चला निकालानंतर तातडीने सरकार स्थापनेसाठीची सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी लोबोंना फोन केल्याची माहिती प्रसारित झाल्यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ वाढली होती. आता लोबोंच्या या दिल्ली दौऱ्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात.

काँग्रेसमध्ये 2017 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण इच्छूक होते. म्हणून सरकार स्थापण्यास उशीर झाला आणि तत्पूर्वीच भाजपने सरकार स्थापन केले. यंदा मात्र काँग्रेसमधील महत्त्वकांक्षी नेत्यांनी काँग्रेस सोडून इतर पक्षांचा आसरा घेतला आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्या नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर लोबो यांनी दिल्लीतल्या गाठीभेटी वाढल्याने त्यांची महत्त्वकांक्षा रुंदावल्याचे स्पष्ट दिसते.

राजकीय रणनीती

राज्यात बहुमताचे सरकार अशक्य असल्याची चाहूल सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे उमेदवारांचे मन वळवण्यात माहीर असलेले काही नेते या कामाला लागले आहेत. भाजप व काँग्रेसने त्यांचे स्वतःचे सरकार स्थापन होणार असल्याचे दावे केले आहेत. तर मगोने सरकार स्थापनेसाठी त्यांचा पाठिंबा घेतल्याशिवाय हे सरकार स्थापन होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

मायकल लोबोंचे भवितव्य बार्देशवर:

माजी मंत्री मायकल लोबो यांचे भवितव्य बार्देशवर आहे. येथून काँग्रेस किती जागा जिंकणार यावर अवलंबून आहे. लोबो यांनी बार्देश तालुक्यातून 5 आमदार निवडून आणल्यास त्यांची मुख्यमंत्रिपदाची दावेदारी प्रबळ बनणार आहे. यामुळे प्रस्थापित काँग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT