Michael Douglas Viral Video At 54 IFFI Goa 
गोवा

हॉलिवूड स्टार मायकल डग्लस 'नाटू नाटू' वर थिरकले, बिग बींचा डायलॉगही बोलला; पाहा व्हिडिओ

डग्लस यांनी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवला आणि नाटू नाटू गाण्यावर देखील थिरकले.

Pramod Yadav

Michael Douglas Viral Video At 54 IFFI Goa: हॉलिवूड मायकल डग्लस यांना ५४ व्या इफ्फीत सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. डग्लस यांनी मंगळवारी कला अकादमी येथे आयोजित मास्टरक्लासला हजेरी लावली. यात डग्लस यांनी त्यांचा अभिनय प्रवास आणि जागतिक सिनेमाबाबत भाष्य केले.

संवादादरम्यान, डग्लस यांनी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवला आणि नाटू नाटू गाण्यावर देखील थिरकले.

मायकल डग्लस यांना इफ्फीतील मास्टरक्लास वेळी मॉडरेटर शैलेंद्र सिंह यांनी अमिताभ बच्चन यांचा डायलॉग बोलून दाखवण्याची विनंती केली. ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह’. हा शहंशाह सिनेमातील डायलॉग डग्लस यांना बोलून दाखवण्याच विनंती केली.

डग्लस यांनी सिंह यांच्या पाठोपाठ हा डायलॉग रिपीट करत शहंशाह ठिकाणी मायकल डग्लस असे नाव घेऊन हा डायलॉग उच्चारला.

संवाद सत्रानंतर मायकल यांनी नाटू नाटू गाण्यावर डान्स केला, यावेळी स्टेजवर त्यांना काही तरुण देखील सहभागी झाले.

दरम्यान, मायकल डग्लस यांना ५४ व्या इफ्फीत सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. नऊ दिवासांच्या या महोत्सवाचा मंगळवारी समारोप होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT