Mhaji Bus Goa Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Mhaji Bus Goa: ‘माझी बस’ योजनेत मोठे बदल! दिगंबर कामतांचे प्रतिपादन; योजनेला अल्प प्रतिसादामुळे चिंता केली व्यक्त

Digambar Kamat Statement : ‘माझी बस’ योजनेला मिळणारा अल्प प्रतिसाद चिंताजनक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mhaji Bus Update : बसमालकांनी कदंब वाहतूक महामंडळातर्फे सुरु केलेल्या ‘माझी बस’ योजनेत आता पूर्वीपेक्षा चांगले बदल केलेले आहेत. जास्त सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, या योजनेला मिळणारा अल्प प्रतिसाद चिंताजनक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

कदंब वाहतूक महामंडळाने ‘माझी बस योजने’ चा मडगावात शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात कामत बोलत होते. ते म्हणाले, या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक लोकाभिमुख व जास्त मजबूत करण्यासाठी या योजनेत जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. या योजनेची मोठ्या प्रमाणात जागृती आवश्यक आहे.

कदंब वाहतूक मंडळाच्या ‘स्मार्ट पास’ व ‘स्मार्ट ट्रांझिट कार्ड’ चा प्रवाशांकडून वापर करुण तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न राखून ठेवू शकतात. हा बदल योजनेत करण्यात आला आहे. शिवाय बस मालकाना ‘ऑपरेशनल’ अनुदान म्हणून प्रती किलोमीटर मागे तीन रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बस नेमकी कुठे आहे हे सुद्धा जाणून घेता येते. योजनेत केलेल्या सुधारणेमुळे प्रत्येक बस मागे वर्षाला २.८४ लाख रुपयाचा लाभ होऊ शकतो. थोडा उशीर झाला तरी ७२ बस मालकांना इंधन अनुदान देण्यात आले अशी माहिती मंत्री कामत यांनी या वेळी दिली.

बसमालकांना सरकारकडून सहकार्य : उल्हास तुयेकर

प्रवाशांची संख्या जरी घटलेली असली तरी सरकारकडून या योजनेमार्फत बस मालकांना सहकार्य करण्यात येणार आहे. गोव्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्याही वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे, आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT