CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: ‘माझे घर’साठी वेळेत दाखले दिले नाहीत, तर मला फोन करा', CM सावंत ॲक्शन मोडवर; ‘पुनर्वसन’च्या सदनिकांचा देणार हक्क

CM Pramod Sawant: गरजच असेल तर भरपाई द्यावी लागेल. ‘माझे घर’साठी पालिकेने वेळेत दाखले दिले नाहीत, तर थेट मला फोन करा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: एखाद्याचे घर रस्त्यालगत असेल, तर त्या घरालाही संरक्षण मिळेल, ते बांधकाम खात्याला पाडता येणार नाही. गरजच असेल तर भरपाई द्यावी लागेल. ‘माझे घर’साठी पालिकेने वेळेत दाखले दिले नाहीत, तर थेट मला फोन करा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

माझे घर योजनेेचे अर्ज वितरणाच्या बायणा रवींद्र भवनात मंगळवारी (ता.१४) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वसामान्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी बांधलेल्या घरांमध्ये त्यांना व पुढील पिढीला सुखासमाधानाने राहता यावे यासाठी ही योजना मार्गी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सडा भागातील गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाच्या वसाहतीतील सदनिकांचा मालकी हक्क संबंधितांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमाला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, संयुक्त मामलेदार जान्हवी केळेकर, गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाचे सदस्य सचिव आलेक्स डिकॉस्ता, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते. जो घर बांधतो,त्याची एकच इच्छा असते की, आपल्यानंतर आपल्या पुढील पिढीलाही या घराचा आसरा मिळाला पाहिजे. त्यांची ती ईच्छा आता पूर्ण होणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितलेे.

‘माझे घर’विरोधींना जवळ करू नका!

सर्वसामान्य गोवेकरांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘माझे घर’ योजनेला विरोध करणाऱ्या लोकांना जवळ करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी होणार आहे, असेही ते म्हणाले.

‘माझे घर’ योजना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यामुळे माझे घरची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. जेणेकरून लोकांना घराचा मालकी हक्क मिळणार आहे.जेणेकरून घर पाडण्यात येईल हे त्यांच्या मनातील भय दूर होणार आहे. मुरगावात बहुतांश घरे सरकारी जमिनीवर असल्याने लोकांना दिवाळीची ही भेट मिळाली आहे.

-संकल्प आमोणकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT