Mhadei River Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: 'म्हादई'चा प्रवाह वळवल्यास गोव्याचे पाणी, मासेमारी संकटात! कर्नाटक, महाराष्ट्रालाही फटका; कॅप्टन धोंड यांचा इशारा

Mhadei Water Dispute: कॅप्टन धोंड म्हणाले की, म्हादई वळविण्याचा धोका हा सीमांच्या पलिकडचा आहे. गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रालाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Sameer Panditrao

फोंडा: म्हादई नदी वळविण्याचा मुद्दा केवळ गोवा किंवा कर्नाटकापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण पश्चिम किनारपट्टीच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम करणारा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक कॅप्टन नीतिन धोंड यांनी केले. .

ते फोंडा येथे झालेल्या म्हादई बचाव आंदोलनाच्या जनजागृती सभेत बोलत होते. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ मयुरेश खंवटे, निर्मल कुलकर्णी, प्रजल साखरदांडे, सुनील देसाई, उदय डांगी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॅप्टन धोंड म्हणाले की, म्हादई वळविण्याचा धोका हा सीमांच्या पलिकडचा आहे. गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रालाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. समुद्राकडे वाहणारे पाणी अडवल्यास गोव्यातील खारटपणा वाढेल, विहिरींचे पाणी खारट होईल आणि मासेमारीवर संकट येईल. परिणामी गोव्याचे पर्यटन, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यावर मोठा परिणाम होईल.

ते पुढे म्हणाले, हा विषय केवळ राजकीय नाही, तर मोठ्या व्यावसायिक हितसंबंधांचा आहे. म्हादईचे पाणी मलप्रभा नदीकडे वळवण्यामागे कर्नाटकातील ऊस उत्पादन व साखर कारखान्यांची वाढती गरज आहे. कर्नाटक सरकारने जल आयोगाची मंजुरी घेतली असून, या निर्णयाला आव्हान देण्याची गरज आहे. बेळगाव आणि खानापूरवासीयांनीही याविरोधात आंदोलन सुरू केले. गोव्यात जागृतीची गरज आहे, असे धोंड यांनी स्पष्ट केले

प्रजल साखरदांडे,पर्यावरणतज्ज्ञ

गोवेकर गेली अनेक दशके म्हादईच्या वळवणाविरोधात लढा देत आहेत. २०१९ मध्ये हा लढा अधिक तीव्र झाला. आजही केंद्रीय जल आयोगाच्या वळवण मंजुरीला कायदेशीर आव्हान देणे आवश्यक आहे. कळसा नाल्याचे वळवणे आधीच पूर्ण झाले आहे. आता भंडुरा नाल्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे वळवणे थांबवण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT