Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mhadei River Dispute: ‘म्हादई’ तपासणींचा अहवाल जाहीर करावा; कर्नाटकच्या बेकायदेशीर बांधकामांवरुन काँग्रेसचा आरोप

Mhadei Water Dispute: भाजप सरकारने कर्नाटक सरकारने म्हादई खोऱ्यात केलेल्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी कोणतीही तपासणी केली नाही. जलस्त्रोतमंत्री शिरोडकर यांनी तपासणींचा अहवाल जनतेसमोर ठेवावा असे आव्हान काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mhadei River Dispute Illegal Constructions At Basin Goa Karnataka

पणजी: भाजप सरकारने एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत (सप्टेंबर २०२४) कर्नाटक सरकारने म्हादई खोऱ्यात केलेल्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी कोणतीही तपासणी केली नाही. आपण केलेला दावा चुकीचा असल्यास जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व तपासणींचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, असे आव्हान काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी आज दिले.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, साखळी गट काँग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक यांची उपस्थिती होती.

कर्नाटकने वन्यजीव मंडळाच्या मान्यतेशिवाय पुन्हा काम सुरू केल्याचे वृत्त आहे. भाजप सरकारचे जलस्त्रोतमंत्री शिरोडकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये गोवा विधानसभेत ४ एप्रिल २०२३ च्या तपासणी अहवालाच्या आधारे म्हादई खोऱ्यात कोणतेही बांधकाम केले जात नाही, असे उत्तर दिले आहे. एप्रिल २०२३ नंतर पाहणी न करताच सरकारने कोणतीही बांधकामे झाली नाहीत, अशी माहिती ऑगस्ट २०२३ मध्ये सभागृहाला कोणत्या आधारावर दिली? असा सवाल पणजीकर यांनी विचारला आहे.

भेटीगाठींवर ६३.६१ लाखांचा खर्च!

भाजप सरकारने म्हादई प्रश्नावर शिष्टमंडळे, मुख्यमंत्री, मंत्री व इतरांच्या भेटींवर २०१२ पासून आजपर्यंत ६३ लाख ६१ हजार ५०२ रुपये खर्च केले आहेत. म्हादईसंबंधीच्या कायदेशीर लढाईवर आत्तापर्यंत १२ कोटी ४४ लाख ७७ हजार ९१२ रुपये खर्च झाला आहे. आमची जीवनदायिनी आई म्हादईचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध असून भाजप सरकारच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे पणजीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT