Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी, ‘करनाटकी’ वृत्ती जात नाही; गोव्यातील पर्यावरणप्रेमींचे टीकास्त्र

Environmentalist Prof. Rajendra Kerkar: कर्नाटक सरकारची काही केल्या ‘करनाटकी’ वृत्ती जात नसून म्हादईवर त्यांची वक्रदृष्टी कायम आहे.
Prof. Rajendra Kerkar
Prof. Rajendra KerkarDainik Gomantak
Published on
Updated on

Mhadai: कर्नाटक सरकारची काही केल्या ‘करनाटकी’ वृत्ती जात नसून म्हादईवर त्यांची वक्रदृष्टी कायम आहे. कर्नाटक पुन्हा म्हादई वळविण्याच्या प्रयत्न करत असून खानापूर नजीकच्या नेरसे गावी कर्नाटक निरावरी निगम लिमिटेटने पाईपलाईन घालण्याचा कामाला सुरवात करण्यात आली आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची किंवा इतर केंद्रीय संस्थांची परवानणी घेतलेली नसताना हे काम सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

केरकर म्हणाले, नेरसे येथून भीमगड अभयारण्य अवघे ५०० मीटर अंतरावरही नाही. त्यामुळे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारे काम करणे कितपत योग्य आहे. कर्नाटकला केंद्रीय जल आयोगाकडून केवळ कळसा-भंडुरा प्रकल्पाला केवळ तांत्रिक परवानगी मिळाली आहे.कर्नाटक निरावरी निगम लिमिटेट वन्यजीव परवाना किंवा पर्यावरण परवाना मिळालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कामाला सुरूवात करता येत नसताना कर्नाटकी डाव दिसून येत असल्याचे केरकर यांनी सांगितले.

Prof. Rajendra Kerkar
Mhadei Water Dispute: कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा आणि कर्नाटक यांच्यातील प्रदीर्घ वाद मिटला असून, त्यांना नदी वळवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे म्हटले होते. हे आता खरे ठरल्यामुळेच राज्यातील भाजप सरकार म्हादईच्या रक्षणासाठी काहीच करत नाही, म्हादईपेक्षा आपले पद वाचवण्याची त्यांना जास्त चिंता आहे, असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com