Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: 'गोमंतकीयासाठी म्हादई पवित्र, सरकार ती विकणार नाही असे वचन द्या' - विजय सरदेसाई

Mahadayi Water Dispute: गोव्याचे भाजप सरकार निर्लज्जपणे खोटे बोलून गोमंतकीयांची फसवणूक करत आहे - विजय सरदेसाई

Pramod Yadav

म्हादई नदीवरुन गोवा आणि कर्नाटक राज्यात वाद सुरु असून, कर्नाटक नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्प बांधला जाणार आहे. यासाठी हालचाली सुरु असून, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावरुन विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. कर्नाटक सरकार प्रकल्पासाठी प्रयत्न करत असताना गोवा सरकार काहीच करत नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

'गोव्याचे भाजप सरकार निर्लज्जपणे खोटे बोलून गोमंतकीयांची फसवणूक करत आहे. म्हादईचा प्रश्न योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च स्तरावर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ देखील उभे करता आले नाही.'

Vijai Sardesai Tweet

'मागील विधानसभेत मी केलेल्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यानंतर सभागृह समिती स्थापन करण्यात आली, परंतु गोवा सरकार एवढे नपुंसक किंवा त्यांच्या हँडलर्सच्या अधीन गेले आहे की त्यांना केवळ एकदाच बोलावण्यात आले. म्हादई प्रत्येक गोमंतकीयासाठी पवित्र आहे आणि त्यांना वचन द्या की हे असंवेदनशील सरकार म्हादई विकणार नाही,' असे ट्विट आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मागणी संदर्भात पत्र दिली. यात म्हादईच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबतच्या पर्यावरणसंबधित मंजुरीचे पत्र देखील देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

SCROLL FOR NEXT