मोदींचा तीनवेळा गोवा दौरा, तरीही श्रीमंत उमेदवाराचा पराभव; माजी मंत्र्यांची कॅप्टनच्या पाठीवर कौतुकाची छाप

विरियातो संसदेत लोकांचा आवाज होतील, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.
मोदींचा तीनवेळा गोवा दौरा, तरीही श्रीमंत उमेदवाराचा पराभव; माजी मंत्र्यांची कॅप्टनच्या पाठीवर कौतुकाची छाप
Viriato Fernandes And Jairam RameshDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा महिन्यात तीनवेळा गोवा दौरा करुन मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. तरीही भारतातील सर्वात श्रीमंत उमेदवारापैकी एक असलेल्या पल्लवी धेंपे यांचा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पराभव केला. अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांचे कौतुक केले.

पहिल्या संसदीय अधिवेशनासाठी नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस सध्या दिल्लीत आहेत. विरियातोंनी माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांची भेट घेतली. भेटीत जयराम रमेश यांनी विरियातोंचे कौतुक केले.

'भारतीय नौदलात 27 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून विजय मिळवला. भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत उमेदवाराविरोधात (पल्लवी धेंपे) त्यांनी निवडणूक लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा महिन्यांत तीनवेळा प्रचारसभा घेतल्या. पण, दक्षिण गोव्यातील लोकांनी भाजप उमेदवार आणि त्यांच्या पक्षाला नाकारले.'

'विरियातोंसोबत गोव्यातील पर्यावरण ऱ्हासासंबधित मुद्यांवर चर्चा झाली. विरियातो संसदेत लोकांचा आवाज होतील,' असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.

विरियातो यांनी जयराम रमेश यांच्यासोबत झालेली बैठक अभ्यासपूर्ण अनुभव देणारी होती असे म्हटले आहे.

'प्रिय जयराम रमेश विरियातोंचा दक्षिणेत विजय होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे भाजपचे स्टार प्रचारक आणि काँग्रेसचे पनौती राहूल गांधी यांनी गोव्यात प्रचार केला नाही. विसरु नका की, दक्षिणेत काँग्रेस 13 हजार मतांनी विजयी झालंय तर उत्तर काँग्रेसचा 1 लाख 16 हजार मतांनी पराभव झाला आहे,' असे उत्तर भाजप नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com