Mhadei Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadei Dispute: "म्हादई प्रवाह प्राधिकरण कर्नाटकच्याच बाजूने!" निर्मला सावंत यांचा थेट आरोप; 'कळसा-भांडुरा'ची प्रत्यक्ष पाहणी करण्याची आग्रही मागणी

Mhadei Bachao Abhiyan: सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या. पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे यावेळी उपस्‍थित होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘‘म्‍हादईप्रश्‍‍नी राज्‍य सरकार अजूनही गंभीर नाही. यासंदर्भात स्‍थापन करण्‍यात आलेले प्रवाह प्राधिकरण कर्नाटकच्‍या बाजूने असल्‍याचे दिसत आहे. ‘प्रवाह’ने कळसा–भांडुराची प्रत्‍यक्ष पाहणी करून योग्‍य तो निर्णय घ्‍यावा’’, अशी मागणी म्‍हादई बचाव अभियानच्‍या निमंत्रक निर्मला सावंत यांनी केली.

सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या. पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे यावेळी उपस्‍थित होते. ‘‘म्‍हादईचा विषय सर्वोच्च न्‍यायालयात असतानाही कर्नाटक सरकार कळसा–भांडुराचे काम पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. तरीही गोवा सरकार गप्‍प बसले आहे. ‘प्रवाह’ने ज्‍यावेळी कळसा–भांडुराच्‍या पाहणीचा मुद्दा उपस्‍थित केला, त्‍यावेळी कर्नाटकने हे प्रकरण सर्वोच्च न्‍यायालयात असल्‍याचे सांगत पाहणीस विरोध केला.

यातूनच कर्नाटकने म्‍हादईचे पाणी वळवण्‍याच्‍या कामाला गती दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते’’, असे सावंत म्‍हणाल्‍या. ‘‘म्‍हादईबाबत कर्नाटक आपल्‍याला हवे ते करीत आहे. तरीही गोवा सरकार याबाबत गंभीर असल्‍याचे अजिबात दिसत नाही. ‘प्रवाह’च्‍या मागील बैठकीच्‍या अजेंड्यात मूळ मुद्दा वगळून केवळ तांत्रिक गोष्‍टींचा समावेश असल्‍याचे समोर आले. त्‍यामुळे पुढील काळात ‘प्रवाह’च्‍या सदस्‍यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन कळसा–भांडुराची प्रत्‍यक्ष पाहणी करावी’’, अशी मागणी त्‍यांनी केली.

प्रवाह अधिकारिणी स्थापन झाल्यापासून आजवर ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हादई तंटा वाटप लवादाने दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणी करण्यासाठी लवादाच्या आदेशानुसारच या अधिकारिणीची स्थापन झाली असली तरी त्या दिशेने आजवर कोणतेही पाऊल अधिकारीणीने टाकलेले नाही.

अन्यथा राज्‍यावर पाण्‍याचे भीषण संकट

‘‘कर्नाटकातील नद्यांमध्‍ये पाणी आहे, परंतु त्‍यांत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. या नद्या गाळ उपसून साफ केल्‍यास कर्नाटकला पाण्‍याचा तुटवडा जाणवणार नाही. तरीही कर्नाटकने जाणीवपूर्वक म्‍हादईवर डोळा ठेवला आहे. त्‍यामुळे गोवा सरकारने कर्नाटकला म्‍हादईचे पाणी वळवण्‍यापासून तत्‍काळ रोखले पाहिजे. अन्‍यथा पुढील काळात राज्‍यावर पाण्‍याचे भीषण संकट ओढवण्‍याची शक्‍यता आहे’’, असेही सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT